गणेश मूर्तिकारांचा ९ रोजी मेळावा…!

⚡मालवण ता.०४-:
सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघातर्फे गणेश मूर्तिकारांचा मेळावा रविवार ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत जानकी मंगल कार्यालय, कुंभारमाठ, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात श्री गणेश मूर्तीकार संघाने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला जाईल. राज्य पातळीवर मूर्तिकारांच्या कामाचाही आढावा सादर केला जाईल. संघाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा व नियोजन, शंका समाधान आणि अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयावर चर्चा होईल. मूर्तिकारांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करुन मार्ग काढता येईल. सर्व मूर्तिकारांनी उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री गणेश मूर्तीकार संघ, माजगाव, सावंतवाडी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page