⚡सावंतवाडी ता.०४-: १५ ऑक्टोबर २०२५ हा दिवस संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेतील इयत्ता आठवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी सौम्या संजय परब हिच्यासाठी एक अभिमानास्पद दिवस ठरला आहे. जिल्हा स्तरावरील हर्डल्स या वैयक्तिक क्रीडा स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दुसरी येण्याचा मान मिळवून आपल्या जबरदस्त कामगिरीची नोंद तिने केली.तिच्या या सातत्यपूर्ण आणि वेगवान कामगिरीमुळे तिची निवड थेट डेरवण चिपळूण येथे होणाऱ्या विभाग स्तरासाठी झाली आहे.
हर्डल्स हा एक अत्यंत आव्हानात्मक आणि तांत्रिक क्रीडा प्रकार आहे. यात धावण्याचा वेग, वेळेची अचूकता (timing) आणि अडथळ्यांवरून उडी मारण्याचे कौशल्य यांचा संगम असावा लागतो. कु. सौम्या संजय परब हिने प्रशालेतील क्रीडा शिक्षिका सौ. धनश्री तुळसकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अथक सराव केला व हे यश संपादन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रणाली रेडकर मॅडम यांनी सौम्या संजय परब हिचे अभिनंदन केले आहे आणि तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रशालेचे चेअरमन आदरणीय डॉक्टर शेखर जैन सर यांनीही सौम्या परब हिचे कौतुक केले त्यांनी “जिद्द, चिकाटी, सराव आणि यश यांचे समीकरण दर्शवणारी सौम्या परब ही आमच्या प्रशालेचे एक उत्तम उदाहरण आहे. तिच्या मेहनतीने इतरांना प्रेरणा मिळेल. आम्हाला खात्री आहे की विभाग स्तरावरही ती चमकदार कामगिरी करेल.”या शब्दात कौतुक केले. या विद्यार्थिनीवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातूनही अभिनंदन यांचा वर्षांव होत आहे.
संस्कार नॅशनल स्कूलची विद्यार्थ्यांनी कु.सौम्या परब हिची हर्डल्स क्रीडा प्रकारामध्ये विभाग स्तरावर निवड…
