आम्हाला महायुतीची गरज नाही,आमचे २० उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा चेहराही तयार…

संजू परब:दीपक केसरकर या शहराचे ‘विकासाचे रत्न..

⚡सावंतवाडी, ता. ०४-:
“आमचे २० उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा चेहराही तयार आहे. आम्हाला महायुतीची गरज नाही,” असा ठाम दावा शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत केला.

परब म्हणाले, “शहरात आमदार दीपक केसरकर यांनी साडेसोळा कोटी रुपयांचा निधी आणून अनेक विकासकामांना गती दिली आहे. केसरकर स्वतः या बाबतीत जास्त बोलत नाहीत, परंतु जनतेपर्यंत हे पोहोचणे गरजेचे आहे म्हणून आम्ही बोलतो.”

ते पुढे म्हणाले, “काही लोक शहराच्या विकासावर बोलतात, पण सावंतवाडीचा सर्वांगीण विकास फक्त दीपक केसरकरच करू शकतात. ते या शहराचे ‘विकासाचे रत्न’ आहेत.”मनोज नाईक यांच्याबाबत विचारले असता परब म्हणाले, “मनोज नाईक माझे जिगरी मित्र आहेत. ते काय बोलतात हे मला माहिती नाही; पण आमच्यातील मैत्री कायम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत विचारले असता परब म्हणाले, “आमचा उमेदवार हा सुशिक्षित, सर्व मराठी-मालवणी, गरीबांच्या समस्या जाणणारी तसेच २४ तास जनतेसाठी उपलब्ध असणारा असेल. लवकरच आम्ही नगराध्यक्षपदाचा चेहरा जाहीर करू,” असे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page