Headlines

सावंतवाडीत भाजप जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०५-:सावंतवाडीतील भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात व थाटात पार पडले. हे जनसंपर्क कार्यालय भाजप पदाधिकारी विशाल परब यांच्या पुढाकाराने उभारण्यात आले असून, या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच राज्याचे पालकमंत्री नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी विशाल परब यांनी सर्व मान्यवर पाहुण्यांचे जोरदार स्वागत…

Read Full News

लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्री.देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या…

⚡सावंतवाडी ता.०५-:: दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. पहाटे विधीवत पुजेनंतर सकाळी ७ वाजल्यापासून देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.सोनुर्ली श्री देवी माऊलीचा वार्षिक लोटांगणाच्या जत्रोत्सवाला दरवर्षी भक्तांची गर्दी होते. यासाठी देवस्थान कमिटीकडून सर्व…

Read Full News

राजकोट मेढा येथील ब्रिटिशकालीन पुरातन स्मारकाची तोडफोड…

किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती आक्रमक:तहसीलदारांना निवेदन सादर करून तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची केली मागणी.. ⚡मालवण,ता.०५-:अठराव्या शतकाच्या प्रारंभी बांधण्यात आलेल्या मालवण शहरातील राजकोट मेढा येथील ब्रिटिशकालीन पुरातन स्मारकाचीअज्ञाताने तोडफोड केल्याचे उघड झाल्यानंतर मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीने या तोडफोडी बाबत प्रशासनाचे लक्ष वेधले असून आज मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांची भेट घेत ब्रिटिश कालीन स्मारकाची तोडफोड करणाऱ्यावर…

Read Full News

सावंतवाडी आगारातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सात दिवसात मार्गी लावा…

भाजप प्रणित एसटी सेवाशक्ती संघटना आगारअध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांची आगार व्यवस्थापकांजवळ मागणी. ⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी आगारातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सात दिवसात मार्गी लावा, अशी मागणी भाजप प्रणित एसटी सेवाशक्ती संघटना सावंतवाडी आगारअध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापकांजवळ निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात आडिवरेकर यांनी म्हटले आहे की, सावंतवाडी आगारात मार्ग फलक बोर्डाची अत्यंत कमतरता असुन अस्पष्ट असणारे…

Read Full News

रुग्णसेवेपासून कितीही रोखले तरी ती रिकामी जागा अजून ताकदीने काम करून भरून काढणार…

रवी जाधव:जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना आमचं सामाजिक कार्य कोणीही रोखू शकत नाही… ⚡सावंतवाडी ता.०५-:“रुग्णसेवेपासून कितीही रोखले तरी ती रिकामी जागा अजून ताकदीने काम करून भरून काढणार,” असा ठाम निर्धार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी जाधव यांनी व्यक्त केला.दरम्यान रुग्णसेवेत कधीच अडथळा येऊ देणार नाही, असा विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले, “माझा मोबाईल नंबर न…

Read Full News

मळगाव येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पाट येथील श्री रामकृष्ण हरी सेवा संघ भजन मंडळ प्रथम…

दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने भजन स्पर्धेचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.०५-: मळगाव-आजगावकरवाडी येथील जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत पाट येथील श्री रामकृष्ण हरी सेवा संघ भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.कणकवली येथील श्री लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय तर कणकवली जानवली येथील श्री सिद्‌धीविनायक प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने मळगाव-आजगावकरवाडी गोसावीवाडी येथील दत्त मंदिर…

Read Full News

मळगाव येथे १६ रोजी स्वरचित काव्य वाचन स्पर्धा ..

राधारंग फाउंडेशनच्यावतीने स्व. सौ अनुराधा तिरोडकर स्मृती प्रित्यर्थ स्पर्धेचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.०५-: मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्गच्यावतीने स्व. सौ अनुराधा अरूण तिरोडकर स्मृती प्रित्यर्थ रविवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.“पाऊस” हा स्पर्धेतील कवितेचा विषय सून स्पर्धेत प्रथम क्रमांक १५००/-, द्वितीय क्रमांक १०००/-, तृतीय…

Read Full News

सबनीसवाडा येथील श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर येथे आज त्रिपुरारी पौर्णिमा जागरोत्सव…

⚡सावंतवाडी ता.०५-: सबनीसवाडा येथील श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर येथे आज ५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा जागरोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्त सायंकाळी ६.३० वाजता दिपोत्सव होणार असून भक्त मंडळींनी किमान ५ पण्त्या, अर्धा लिटर तेल व वाती घेऊन स्वतः पणत्या मंदिर परीसरात प्रज्वलीत कराव्या. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता तुलसी विवाह, रात्री ८. ०० वाजता…

Read Full News

सावंतवाडीची जनता सत्ताधाऱ्यांचा “पैशाचा माज” नगरपालिका निवडणुकीत उतरवणार…

निशांत तोरसकर यांची टीका: सावंतवाडीची जनता ठाकरे शिवसेनेच्या बाजूने राहणार.. ⚡सावंतवाडी, ता.०५-: आगामी सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा “पैशाचा माज” सावंतवाडीकर उतरवतील, असा आरोप ठाकरे शिवसेना शहर संघटक निशांत तोरसकर यांनी केला. ते म्हणाले, “विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करण्यातच सत्ताधाऱ्यांचा भर आहे. शहराचा खराखुरा विकास झालाच नाही. त्यामुळे आता जनतेत प्रचंड नाराजी असून येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीतून…

Read Full News

ठाकरे सेनेकडून नगराध्यक्षपदासाठी सिमा मठकर यांच्या नावाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला…

निशांत तोरसकर यांची माहिती:ठाकरे गटाची शिवसेना सावंतवाडी नगरपरिषदेच्या रणांगणात पूर्ण ताकदीने उतरणार.. ⚡सावंतवाडी, ता.०५-:आगामी सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाची शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असून, कुठेही मित्रपक्षाला दुखावेल असे कोणतेही पाऊल न उचलता पक्षाची तयारी सुरू असल्याची माहिती ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक निशांत तोरसकर यांनी दिली. तोरसकर म्हणाले की, “आम्ही नगराध्यक्षपदासाठी सिमा मठकर यांना उमेदवारी…

Read Full News

You cannot copy content of this page