Headlines

हडी येथील कालिका देवीचा त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव उत्साहात साजरा…

⚡मालवण ता.०५-:हडी येथील श्री कालिका देवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव उत्साहात आणि बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मंदिर परिसरात दिव्यांची आरास व रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली श्री रामाची प्रतिमा लक्षवेधी ठरली. त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सवानिमित्त कालिका देवी मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी देवीच्या मंगल स्नानाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन देवीला सुवासिक फुलांची मनमोहक आरास करण्यात आली….

Read Full News

“पायी हळूहळू चाला, मुखी दत्तनाम बोला”…

मालवणच्या दत्त मंदिरातील काकड आरती सोहळ्याची सांगता.. ⚡मालवण ता.०५-: “दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा जयघोष करत टाळ मृदूंगाच्या साथीने आणि ढोल ताशांच्या गजरात आज मालवण भरड येथील दत्त मंदिरात कार्तिक स्नान समाप्तीच्या निमित्ताने पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला. या सोहळ्यास शेकडो भाविक सहभागी झाले होते. मालवण शहरातील भरड येथील जागृत देवस्थान असलेल्या एकमुखी दत्त…

Read Full News

मालवण शहरातील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत…

सौ. शिल्पा खोत यांची मागणी.. ⚡मालवण ता.०५-:मालवण शहरातील प्रमुख रस्त्यांची अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. वाहन चालक, नागरिकांना खड्डेमय रस्त्यांमुळे त्रासाला सामोरे लागत आहे. रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून तात्काळ बुजवण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा यतीन खोत यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांच्याकडे केली आहे. मालवण शहरातील स्वामी हॉटेल, सरस्वती टॉकीज, लिमिये हॉस्पिटल…

Read Full News

कुसरवे येथील भातशेती नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…

⚡मालवण ता.०५-:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण तालुक्यातील कुसरवे येथील शेतकरी संजय चव्हाण यांच्या भात शेतीला भेट देऊन अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार मालवण वर्षा झाल्टे,…

Read Full News

कुडाळ न.पं.च्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी केली मलकापूर आणि विटा न. प. च्या घनकचरा प्रकल्पांची पाहणी…

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी मलकापूर व विटा नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पांची पाहणी केली. या प्रकल्पांमध्ये वापरण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची साधने आणि मनुष्यबळ याबाबत माहिती घेतली.कुडाळ नगरपंचायतीने एमआयडीसी येथे कचरा व्यवसथापन उद्योग प्रकल्पासाठी जागा घेतली आहे. हा उद्योग प्रकल्प कोणालाही त्रासदायक होऊ नये या प्रकल्पातून प्रदूषित हवा दुर्गंधी निर्माण होऊ नये याची काळजी कशाप्रकारे घेतली…

Read Full News

गुलाल भाजप उधळेल…

विशाल परब:आरोग्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार.. ⚡सावंतवाडी ता.०५-: आचारसंहिता लागू झाली आहे. कोकणचे सुपुत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री आहेत. हे कार्यालय आपलं आहे. तुमच्यासाठी ते २४×७ खुलं आहे‌. ३ डिसेंबरला गुलाल आपल्यालाच उधळायचा आहे असा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला. तसेच आरोग्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार आहे….

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा प्रदेशाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे…

ॲड राहुल नार्वेकर :महाराष्ट्रात भाजपच कमळ दिसेल.. ⚡सावंतवाडी ता०५-: सिंधुदुर्ग जिल्हा प्रदेशाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. भाजप विश्वातील सर्वात मोठी पार्टी आहे. जनसेवेसाठी कार्यालय सुरू करून सरकारच्या योजनांचा लाभ त्यांना दिला जाणार आहे. ३ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच कमळ दिसेल असा विश्वास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त करत आगामी नगरपरिषदेत भाजपला यश…

Read Full News

आम्हाला कोणाची जिरवायची नाही, पण सिंधुदुर्गचा विकास करायचाय…

पालकमंत्री नितेश राणेनगराध्यक्ष पदावर मी ज्यांना बसवले तेच आज आम्हाला आव्हान देण्याचे भाषा करतायत,आम्ही नेमकं कुठे चुकलो हेच कळत नाही.. ⚡सावंतवाडी, ता. ०५-:“सिंधुदुर्गच्या नव्वद टक्के लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. आम्ही कोणाचाही अधिकार हिसकावून घेत नाही. रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत. आम्हाला कोणाची जिरवायची नाही, पण सिंधुदुर्गचा विकास…

Read Full News

सावंतवाडीत ठाकरे सेनेला मोठा धक्का…

माजी जि.प. सदस्य मायकल डिसोजा आणि माजी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; ⚡सावंतवाडी, ता. ०५-:सावंतवाडीत ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आणि माजी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री नितेश…

Read Full News

सावंतवाडीत ठाकरे सेनेला मोठा धक्का…

माजी जि.प. सदस्य मायकल डिसोजा आणि माजी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.. ⚡सावंतवाडी, ता. ०५-: सावंतवाडीत ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आणि माजी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री…

Read Full News

You cannot copy content of this page