Headlines

कणकवली तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीवर दीपक दळवी यांची नियुक्ती…

कणकवली : तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजना समितीवर दिव्यांग प्रवर्गातील अशासकीय प्रतिनिधी पदावर दीपक अनंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत असून, दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची निवड उपयुक्त ठरणार असल्याचे मत स्थानिक स्तरावर व्यक्त केले जात आहे. श्री. दळवी हे समाजकार्यात सक्रिय असून, त्यांनी दिव्यांग…

Read Full News

भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२५ साठी जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख व निवडणूक प्रभारी जाहीर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक प्रभारी म्हणून प्रमोद जठार तर निवडणूक प्रभारी म्हणून पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्यावर जबाबदारी.. कणकवली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक २०२५ साठी जिल्हानिहाय निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही घोषणा बुधवारी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून करण्यात आली. भाजपा पक्षाने राज्यातील…

Read Full News

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश…

सावंतवाडी: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. श्री‌. साळगावकर हे पाच वर्षांहून अधिक काळ नगराध्यक्ष राहीले आहेत. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे ते एकेकाळी निकटवर्तीय होते‌. आज त्यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला…

Read Full News

हडी येथील कालिका देवीचा त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव उत्साहात साजरा…

⚡मालवण ता.०५-:हडी येथील श्री कालिका देवी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव उत्साहात आणि बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मंदिर परिसरात दिव्यांची आरास व रांगोळीच्या माध्यमातून साकारलेली श्री रामाची प्रतिमा लक्षवेधी ठरली. त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सवानिमित्त कालिका देवी मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी देवीच्या मंगल स्नानाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन देवीला सुवासिक फुलांची मनमोहक आरास करण्यात आली….

Read Full News

“पायी हळूहळू चाला, मुखी दत्तनाम बोला”…

मालवणच्या दत्त मंदिरातील काकड आरती सोहळ्याची सांगता.. ⚡मालवण ता.०५-: “दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा जयघोष करत टाळ मृदूंगाच्या साथीने आणि ढोल ताशांच्या गजरात आज मालवण भरड येथील दत्त मंदिरात कार्तिक स्नान समाप्तीच्या निमित्ताने पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला. या सोहळ्यास शेकडो भाविक सहभागी झाले होते. मालवण शहरातील भरड येथील जागृत देवस्थान असलेल्या एकमुखी दत्त…

Read Full News

मालवण शहरातील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत…

सौ. शिल्पा खोत यांची मागणी.. ⚡मालवण ता.०५-:मालवण शहरातील प्रमुख रस्त्यांची अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. वाहन चालक, नागरिकांना खड्डेमय रस्त्यांमुळे त्रासाला सामोरे लागत आहे. रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून तात्काळ बुजवण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा यतीन खोत यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांच्याकडे केली आहे. मालवण शहरातील स्वामी हॉटेल, सरस्वती टॉकीज, लिमिये हॉस्पिटल…

Read Full News

कुसरवे येथील भातशेती नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…

⚡मालवण ता.०५-:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण तालुक्यातील कुसरवे येथील शेतकरी संजय चव्हाण यांच्या भात शेतीला भेट देऊन अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार मालवण वर्षा झाल्टे,…

Read Full News

कुडाळ न.पं.च्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी केली मलकापूर आणि विटा न. प. च्या घनकचरा प्रकल्पांची पाहणी…

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी मलकापूर व विटा नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पांची पाहणी केली. या प्रकल्पांमध्ये वापरण्यात आलेल्या यंत्रसामग्रीची साधने आणि मनुष्यबळ याबाबत माहिती घेतली.कुडाळ नगरपंचायतीने एमआयडीसी येथे कचरा व्यवसथापन उद्योग प्रकल्पासाठी जागा घेतली आहे. हा उद्योग प्रकल्प कोणालाही त्रासदायक होऊ नये या प्रकल्पातून प्रदूषित हवा दुर्गंधी निर्माण होऊ नये याची काळजी कशाप्रकारे घेतली…

Read Full News

गुलाल भाजप उधळेल…

विशाल परब:आरोग्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार.. ⚡सावंतवाडी ता.०५-: आचारसंहिता लागू झाली आहे. कोकणचे सुपुत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री आहेत. हे कार्यालय आपलं आहे. तुमच्यासाठी ते २४×७ खुलं आहे‌. ३ डिसेंबरला गुलाल आपल्यालाच उधळायचा आहे असा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला. तसेच आरोग्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार आहे….

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा प्रदेशाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे…

ॲड राहुल नार्वेकर :महाराष्ट्रात भाजपच कमळ दिसेल.. ⚡सावंतवाडी ता०५-: सिंधुदुर्ग जिल्हा प्रदेशाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. भाजप विश्वातील सर्वात मोठी पार्टी आहे. जनसेवेसाठी कार्यालय सुरू करून सरकारच्या योजनांचा लाभ त्यांना दिला जाणार आहे. ३ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच कमळ दिसेल असा विश्वास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त करत आगामी नगरपरिषदेत भाजपला यश…

Read Full News

You cannot copy content of this page