नगरसेविका मोहिनी मडगावकर यांचा विश्वास:नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले यांना नवीन वर्षाच्या दिल्या शुभेच्छा..
⚡सावंतवाडी ता.०१-:
प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका मोहिनी मडगांवकर यांनी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी नवीन वर्षात लोकांच्या मतांचा आदर ठेवून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा तसेच सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक व लोकाभिमुख काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
नवीन वर्ष हे शहराच्या विकासासाठी नवे पर्व ठरावे, नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेने एकसंघपणे काम करावे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
