अत्यंत अल्प दरात होणार नेत्र शस्त्रक्रिया तसेच विविध तपासण्या..
⚡सावंतवाडी ता.०१-: नॅब नेत्र रुग्णालय भटवाडी सावंतवाडी यांच्या मोबाईल व्हॅन द्वारे सावंतवाडी , वेंगुर्ला ,दोडामार्ग मालवण, कुडाळ या तालुक्यात मोफत नेत्र तपासणीचा फायदा आतापर्यंत हजारो नेत्र रुग्णांनी घेतला आहे.
अद्यावत नेत्र तपासणी व्हॅनचा उपयोग आज जिल्ह्यातील नेत्र रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे .नेत्र तपासणी विनाशुल्क असल्यामुळे सर्वांनाच याचा फायदा मिळत आहे .आतापर्यंत शंभराच्या वर नेत्र तपासणी शिबिरे नॅब तर्फे जिल्ह्यातील विविध गावांमधून घेण्यात आली आहेत. हजारो नेत्र रुग्णांनी शिबिराचा फायदा घेतला असून जवळपास १००० हून जास्त नेत्र रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया फेको मशीनच्या सहाय्याने अत्यंत अल्प दरात करण्यात आल्या आहेत. बऱ्याच नेत्र रुग्णांना अत्यंत अल्प दरात चष्मांचे वाटप ही करण्यात आले.
नॅब नेत्र रुग्णालय सावंतवाडी येथे कार्यरत असलेले डॉक्टर व सहकारी अत्यंत कुशल असून सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत सेवाभावी वृत्तीने नेत्र रुग्णालयाचे कामकाज करत आहेत. या नेत्र रुग्णालयाच्या उभारणीमध्ये अनेक दात्यांचे सहकार्य लाभलेले आहे या देणगीदारांकरिता ८० जी अंतर्गत प्राप्तिकर सवलत मिळते.
सन २०२६ या नूतन वर्षारंभाच्या निमित्ताने जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू अशा नेत्र रुग्णांकरिता अत्यंत अल्प दरात म्हणजेच रुपये १०००/- एवढ्या अल्प दरात नेत्र शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
गरजू नेत्र रुग्णांनी दिनांक ५जानेवारी ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत नॅब नेत्र रुग्णालय भटवाडी (तालुका सावंतवाडी) येथे नाव नोंदणी करावयाची आहे तसेच
जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू स्त्रियांकरिता नेत्र शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे याकरिता सर्वप्रथम गरजू स्त्रियांनी रुग्णालयांमध्ये येऊन नेत्र तपासणी करून घ्यावयाच्या आहेत व त्यानंतरच आवश्यक स्त्री नेत्र रुग्णांनी शस्त्रक्रिये करिता नाव नोंदणी करण्याची आहे नाव नोंदणी करिता दिनांक ५ जानेवारी ते ११ जानेवारी असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी इनरव्हिल चेअरमन उत्कर्ष संग्राम पाटील कोल्हापूर यांच आर्थिक सहाय्य लाभणार आहे तरी जास्तीत जास्त स्त्रीनेत्र रुग्णांनी याचा फायदा घ्यावा.
त्याचबरोबर डोळ्यातील जाळी काढणे ,नेत्र पडद्यावरील विविध उपचार व सोनोग्राफी ची उत्तम सोय या रुग्णालयात करण्यात आलेली आहे.
. नेत्र रुग्णांनी नॅबनेत्र रुग्णालयातील या विविध सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन नॅब सिंधुदुर्ग चे अध्यक्ष अनंत उचगावकर व सोमनाथ जिगजिन्नी यांनी केले आहे.
