Headlines

आम.दीपक केसरकर यांनी घेतले सोनुर्ली येथील श्री. देवी माऊलीचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.०६-: प्रतिपंढरपूर सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. आज जत्रोत्सवाला त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी देवस्थान समितीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघातील जनतेसह महाराष्ट्रातील जनतेला सुखी, समाधानी ठेवण्याचं साकडं घातलं. उपस्थित भाविकांना त्यांनी जत्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Full News

सावंतवाडीकरांच्या मनातला शिंदे शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असणार…

आमदार दीपक केसरकर:आमचा नगराध्यक्ष 24 तास जनसेवेचे काम करणारा असणार.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडीकरांच्या मनातला उमेदवार नगराध्यक्ष पदाचा दिला जाईल. असे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा 24 तास जनसेवेचे काम करणारा असणार आहे असेही ते म्हणाले. सावंतवाडी वेंगुर्ले मालवण या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष असतील असे ते म्हणाले यावेळी…

Read Full News

तेंडोली येथील अनलादेवीचा उद्या जत्रोत्सव…

⚡कुडाळ ता.०६-: तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वार्षिक जत्रोत्सव ७ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळपासून ओटी भरण्याचा कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता पुराण वाचन, १० वाजता पालखी सोहळा, १२ वाजता मामा मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. उपस्थितीत राहावे, असे आवाहन अनलादेवी ग्रामस्थ मंडळाने केले आहे.

Read Full News

उद्यापासून कुडाळ मध्ये ‘कुडाळदेशकारां’चा १० वा क्रीडामहोत्सव…

सकाळच्या सत्रात क्रीडा स्पर्धा तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम:आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलादालन खास आकर्षण,अध्यक्ष रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡कुडाळ ता.०६-: गौड ब्राह्मण सभा आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्था यांच्या वतीने दि. ७, ८ आणि ९ नोव्हेंबरला कुडाळमध्ये १०वा क्रीडा महोत्सव अर्थात KPI. २०२५ चे आयोजन करण्यात आलं आहे. याची सुरुवात ७ नोव्हेंबरला…

Read Full News

ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा…

गुरुदास गवंडे: सावंतवाडी उपवनसंरक्षण यांचे निवेदनद्वारे वेदले लक्ष.. ⚡बांदा ता.०६-: सावंतवाडी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून संचार करणाऱ्या प्रसिद्ध वन्यजीव हत्ती ओंकार याच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दांड्याने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमींत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी निगुडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी…

Read Full News

नगराध्यक्ष झालो ते राणें, चव्हाण आणि जनतेच्या आशीर्वादानेच…

संजू परब:केसरकरांची ताकद आजही कायम असल्याचा केला दावा.. ⚡सावंतवाडी, ता. ०६ :“मी नगराध्यक्ष झालो ते खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सावंतवाडीची जनता, पाटेकर-उपरलकर यांच्या आशीर्वादामुळेच,” झालो असा टोला शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नाव न घेता पालकमंत्री नितेश राणेंवर अप्रत्यक्ष लगावला. परब म्हणाले की, “केसरकरांची या मतदारसंघात ताकद आजही…

Read Full News

नगराध्यक्ष झालो ते राणें, चव्हाण आणि जनतेच्या आशीर्वादानेच…

संजू परब:केसरकरांची ताकद आजही कायम असल्याचा केला दावा.. ⚡सावंतवाडी, ता. ०६ :“मी नगराध्यक्ष झालो ते खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सावंतवाडीची जनता, पाटेकर-उपरलकर यांच्या आशीर्वादामुळेच,” झालो असा टोला शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नाव न घेता पालकमंत्री नितेश राणेंवर अप्रत्यक्ष लगावला. परब म्हणाले की, “केसरकरांची या मतदारसंघात ताकद आजही…

Read Full News

बबन साळगावकर यांचा भाजप प्रवेशानंतर पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत…

⚡सावंतवाडी, ता.०६-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांचा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काल रात्री पार पडला. या प्रसंगी भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी साळगावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान साळगावकर यांच्या प्रवेशामुळे आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवे बळ मिळणार असल्याची…

Read Full News

बांद्यात उड्डाणपुलाखाली अपघात; कॅन्टरच्या धडकेत महिला गंभीर जखमी…

बांदा/प्रतिनिधी. बांदा शहरात उड्डाणपुलाखाली श्रीराम चौकात कॅन्टरने दुचाकीला भरधाव वेगात धडक दिली. यात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली महिला रस्त्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाली. बांदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघात स्थळावरून पळून जाणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले आहे. हा अपघात आज सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास झाला. दुचाकीवरील जोडपे सावंतवाडीहुन बांद्यात येत होते. तर कॅन्टर दोडामार्गहुन भरधाव वेगात…

Read Full News

भोसले फॉर्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींना केंद्र शासनाची रिसर्च स्कॉलरशिप…

⚡सावंतवाडी ता.०६-: यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या दोन विद्यार्थिनींना केंद्र सरकारची रिसर्च स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. बी.फार्मसी अंतिम वर्षात शिकणाऱ्या पौर्णिमा महाले आणि एम.फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या भक्ती पालेकर या विद्यार्थिनींना अनुक्रमे तीन व सहा महिन्यांसाठी ही स्कॉलरशिप मिळाली आहे._ या अंतर्गत पौर्णिमाला तीन महिन्यांसाठी दरमहा दहा हजार, तर भक्तीला सहा महिन्यांसाठी दरमहा पंधरा हजार अशी…

Read Full News

You cannot copy content of this page