सलग दहा वर्षे विज्ञान प्रदर्शनात अव्वल कामगिरी; प्रयोगशाळा सहाय्यक सूर्यकांत चव्हाण यांचा सत्कार…

⚡बांदा ता.०१-: गेली सलग दहा वर्षे विज्ञान प्रदर्शनात अव्वल कामगिरी करणाऱ्या बांदा खेमराज हायस्कुलचे प्रयोगशाळा सहाय्यक सूर्यकांत चव्हाण यांचा सत्कार धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

श्री चव्हाण हे खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून गेली १२ वर्षे कार्यरत आहेत. या वर्षी झालेल्या विज्ञान प्रदर्शनात श्री चव्हाण यांनी सदर केलेल्या विज्ञान प्रतिकृतीला जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच तालुका स्तरावर सलग दहा वर्षे प्रथम क्रमांक, जिल्हा स्तरावर सात वर्षे प्रथम क्रमांक तर ३ वेळा राज्य स्तरावर त्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतीना यश मिळाले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदाच्या वार्षिक स्नेहसंमेलनच्या उद्घाटन प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. (कै.) आबासाहेब तोरसकर यांनी माझ्यातील गुण ओळखून मला प्रयोगशाळा सहाय्यक पदी बढती दिली त्यामुळेच मी माझ्या प्रतिभेला न्याय देऊ शकलो. सातत्याने शिकण्याची वृत्ती आणि जो पर्यंत यश मिळत नाही, समाधान होत नाही तो पर्यंत चिकाटीने काम करण्याची वृत्ती यश मिळवण्यासाठी मला प्रेरित करते असे सूर्यकांत चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. सूर्यकांत चव्हाण यांच्या यशा बद्दल सर्व सहकारी वर्ग आणि विद्यार्थी व पालक वर्गातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page