भंडारी समाजाच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा ४ जानेवारी रोजी भव्य सत्कार…

⚡मालवण,ता.०१-:
सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण आणि भंडारी ज्ञाती बांधवांच्या वतीने शहरातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मालवण भरड येथील लीलांजली हॉल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

या सोहळ्यात मालवण शहराच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा ममता मोहन वराडकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच नवनिर्वाचित नगरसेवक तपस्वी मयेकर, अश्विनी कांदळकर, भाग्यश्री मयेकर यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
या सत्कार सोहळ्याच्या नियोजनासाठी सकल भंडारी हितवर्धक संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला संस्थेचे अध्यक्ष रवींद्र तळाशीलकर, उपाध्यक्ष सुनील नाईक, प्रदीप वेंगुर्लेकर, सचिव पंकज पेडणेकर, सहसचिव सागर हडकर, राजेंद्र आंबेरकर, जयप्रकाश परुळेकर, मिलिंद झाड, अजित गवंडे, श्रीकांत वेंगुर्लेकर, भाऊ साळगावकर, राजीव आचरेकर, भाऊ हडकर हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भंडारी समाजातील लोकप्रतिनिधींनी मिळवलेले हे यश समाजासाठी अभिमानास्पद असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सर्व ज्ञाती बांधवांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page