Headlines

आरोंदा शाळेतील विद्यार्थ्यांना चंदगड येथील निंगोजी पाटील यांच्यावतीने स्पोर्ट्स ड्रेस…

सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा आरोंदा नं. १ मध्ये शैक्षणिक उठावातून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चंदगड येथील निंगोजी पाटील यांच्यावतीने स्पोर्ट्स ड्रेस देण्यात आले.या स्पोर्टचे ड्रेसचे वितरण आरोंदा सरपंच सायली साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणपत गावडे, निंगोजी कोकितकर, विलास आवडण, ऋतुजा राणे, नूतन निउंगरे आदी उपस्थित होते. चंदगड तालुक्यातील गुडेवाडी…

Read Full News

मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबईच्यावतीने धाकोरे शाळेला संगणक भेट…

⚡सावंतवाडी ता.११-: मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबईच्यावतीने धाकोरे (वसवाचे तळे) प्राथमिक शाळेला संगणक भेट देण्यात आला.धाकोरे वसवाचे तळे प्राथमिक शाळेला आवश्यक असलेल्या संगणकबाबत धाकोरे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव यांनी मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट मुंबई या संस्थेकडे पाठपुरावा केला होता. पालव यांच्या पाठपुराव्याला अनुसरून या संस्थेने शाळेला एक संगणक भेट दिला. यावेळी अमित बने…

Read Full News

कुणकेरी भाजप बूथप्रमुख रामचंद्र उर्फ बाळा परब यांची शिंदे शिवसेनेत घरवापसी…

संजू परब यांच्याकडून स्वागत: जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर महेश सारंग यांना धक्का.. ⚡सावंतवाडी, ता.११-: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोलगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील भाजपचे बूथप्रमुख रामचंद्र उर्फ बाळा परब (रा. कुणकेरी) यांनी आज शिंदे गटातील शिवसेनेत पुनर्प्रवेश केला. शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. परब यांच्या या घरवापसीमुळे भाजप…

Read Full News

जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते कु.गार्गी किरण सावंत हिला २०२५-२६ चा विशेष गौरव पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.११-: शांतीनिकेतन इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेली कोलगाव येथील कु.गार्गी किरण सावंत हिला माजी सैनिक कल्याण कार्यालयतर्फे देण्यात येणारा २०२५-२६ चा विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते गार्गीला देण्यात आला. रु.२५,००० रोख रक्कम, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गार्गीच्या उल्लेखनीय कामगिरीचा…

Read Full News

मंदिरांना मिळणाऱ्या किंवा खरेदी केलेल्या जमिनींवरील मुद्रांक व नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करा…

महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी: नायब तहसीलदार यांना निवेदन सादर.. ⚡सावंतवाडी,ता.११-:देवस्थानांना दानरूपाने मिळणाऱ्या किंवा देवस्थानांद्वारे खरेदी करण्यात येणाऱ्या जमिनींच्या हस्तांतरण व्यवहारांवर कंपनी किंवा सहकारी संस्थांप्रमाणे आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क तसेच अन्य सर्व प्रकारचे कर पूर्णपणे माफ करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, महसूलमंत्री चंद्रशेखर…

Read Full News

वेंगुर्ल-शिंदे गट शिवसेना तालुक्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त…

सचिन देसाई यांची प्रभारी तालुका प्रमुखपदी नियुक्ती: संजू परब यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.११-: वेंगुर्ल-शिंदे गटातील शिवसेनेची तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून याबाबतची माहिती संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर नव्याने कार्यकारिणी नियुक्त करण्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, नवीन प्रभारी तालुका प्रमुखपदी सचिन देसाई यांची नियुक्ती करण्यात…

Read Full News

वेंगुर्ल-शिंदे गट शिवसेना तालुक्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त…

सचिन देसाई यांची प्रभारी तालुका प्रमुखपदी नियुक्ती: संजू परब यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.११-: वेंगुर्ल-शिंदे गटातील शिवसेनेची तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून याबाबतची माहिती संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर नव्याने कार्यकारिणी नियुक्त करण्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, नवीन प्रभारी तालुका प्रमुखपदी सचिन देसाई यांची नियुक्ती करण्यात…

Read Full News

विद्यार्थ्यांनी आईवडील व मार्गदर्शक शिक्षक यांचे आदर्श घेऊन अध्ययन करावे : संतोष गोसावी…

⚡वेंगुर्ला ता.१०-: आज जग गतिमान झाले असून जीवन सुखकर करावयाचे असेल तर विज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग करून प्रगती साधणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांचे कलात्मक गुण विकसित होत असतात. विज्ञानात संधी भरपूर असणार असून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून बुद्धीला चालना देऊन आईवडील व मार्गदर्शक शिक्षक यांचे आदर्श घेऊन अध्ययन करावे, असे प्रतिपादन वेंगुर्ला…

Read Full News

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जीएस पदी सर्वेश राणे याची निवड…

⚡मालवण ता.१०-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थी मंडळ निवड प्रक्रियेमध्ये विज्ञान विभागाचा विद्यार्थी सर्वेश महेंद्र राणे याची जनरल सेक्रेटरी (GS) पदी निवड झाली. या निवडीबद्दल स. का. पाटील महाविद्यालय, विज्ञान विभाग, सांस्कृतिक विभाग, जिमखाना विभाग व कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वेश राणे याचे अभिनंदन करण्यात…

Read Full News

नफ्याच्या आमिषाने कणकवलीतील महिलेची १२ लाख २७ हजारांची फसवणूक…

कणकवली : अल्पकाळात मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका ४० वर्षीय व्यक्तीने कणकवलीतील तरुणीची १२ लाख २७ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली विश्वास संपादन करून हा मोठा गंडा घालण्यात आला आहे. त्या महिलेच्या तक्रारीवरून संदीप अंकुश पाटील (४०, रा. राजारामपुरी- कोल्हापूर) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा…

Read Full News

You cannot copy content of this page