⚡मालवण ता.२८-:
मालवण शहरातील सागरी महामार्गावर वीज महावितरण कंपनीकडून भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदलेला चर व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने याठिकाणी अपघात घडत होते. याबाबत भाजपचे नगरसेवक ललित चव्हाण यांनी वीज कंपनीकडे पाठपुरावा केल्यानंतर भूमिगत वीज वाहिनीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदराकडून हा चर बुजविण्यात आला.
भूमिगत वीज वाहिनीसाठी वीज महावितरण कंपनीकडून सागरी महामार्गांवर खोदाई करण्यात आली होती. मात्र खोदलेले चर बुजविण्यात आले नव्हते. या चरा मुळे दोन अपघातही घडले होते. याबाबत नगरसेवक ललित चव्हाण यांनी वीज कंपनीचे लक्ष वेधत सदर चर तात्काळ बुजविण्याची सूचना केली होती. त्यानुसार संबंधित ठेकेदाराकडून हा चर बुजविण्याचे काम नगरसेवक ललित चव्हाण यांनी स्वतः उपस्थित राहून करून घेतले. खडी व डांबराने हा चर बुजविण्यात आला. तसेच याच रस्त्यावरील उर्वरित दोन चर देखील बुजविण्याची सूचना नगरसेवक ललित चव्हाण यांनी केली आहे. यावेळी नगरसेवक चव्हाण यांच्या समवेत भाजप युवा मोर्चा बूथ अध्यक्ष निनाद बादेकर, संज्या खोत, समीर मडये, अजय आळवे आदी उपस्थित होते.
