⚡मालवण ता.२८-:
लायन्स क्लब मालवण, डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेंटर, मालवण आणि माघी गणेश उत्सव मंडळ, तारकर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महापुरुष मंदिर, तारकर्ली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून बहुसंख्य नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. यावेळी दहा गरीब व गरजू रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
या नेत्र तपासणी शिबिरासाठी डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयाचे डॉ. अनिरुद्ध तेली, मालवण सेंटर इन्चार्ज वेदा माणगावकर, कर्मचारी वैभव माणगावकर, मधुरा चव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे. तर गरजू रुग्णांना लायन्स क्लब सदस्य महेश अंधारी व गणेश प्रभुलीकर यांच्या सहकार्यातून करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण, सदस्य महेश अंधारी, गणेश प्रभुलीकर, राजा शंकरदास, नंदिनी गावकर, जयश्री हडकर तसेच माघी गणेशोत्सव मंडळ, तारकर्लीचे सदस्य किशोर (भाई) कुबल, सतीश टिकम, धोंडी कांदळगावकर, कुणाल बापर्डेकर, निवृत्ती कोळंबकर आदी व इतर उपस्थित होते.
