भाजप नगरसेवकांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली…

⚡सावंतवाडी ता.२८-:
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने देशासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचे प्रतिपादन भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी केले.
येथील भाजप शहर कार्यालयात आयोजित श्रद्धांजली सभेत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला.

You cannot copy content of this page