आशिये-बाणेवाडी मार्गावरील वाहतूक ठप्प
कणकवली : शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे कणकवली शहरातील आशिये – बाणेवाडी मार्गावर मोठा वटवृक्ष रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेत महावितरण विभागाचा एक वीज खांब (पोल) तसेच विद्युत वाहिन्यांचेही नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर कोसळलेला वटवृक्ष हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम हाती घेतले.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर, महावितरण विभागाचे अधिकारी श्री. स्वामी, पोलीस हवालदार सुभाष शिवगण, रवींद्र महाडेश्वर, मनोज तोरसकर, नगरपंचायतीचे कर्मचारी सत्यवान कासले, संदीप उंबळकर, पदाधिकारी सुजित जाधव तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.
संबंधित यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
