Headlines

दुर्लक्षाचा फटका! ११ केव्ही विद्युत पोल कोसळला…

चार दिवसापूर्वी धोका सांगूनही झाडांची छाटणी झाली नाही:कास सरपंच प्रवीण पंडित यांचा आरोप..

⚡बांदा,ता.०४-: ०३ जुलै रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कास परिसरातील ११ केव्ही वीजवाहिनीचा एक विद्युत पोल कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. या घटनेनंतर कास ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण पंडित यांनी महावितरणच्या बांदा विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
सरपंच प्रवीण पंडित यांनी सांगितले की, चार दिवसापूर्वी वीजवाहिनीवर झाडांच्या फांद्या आल्या असून पावसाळ्यात मोठा अपघात होऊ शकतो, अशी तोंडी सूचना महावितरणला देण्यात आली होती. विशेषतः कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर यांना याबाबत वेळोवेळी कल्पना देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही झाडांची आवश्यक छाटणी करण्यात आली नाही. सदर रस्ता रात्री वाहतूक बंद करावी लागली तसेच मी जर घटना दिवसाढवळ्या घडली असती तर त्याला जबाबदार कोण शाळा बाजूला बसून शाळेतील विद्यार्थी येता जातात त्यामुळे सर्व काम निकृष्ट दर्जाचे आहे आणि याला कनिष्ठ अभियंता जबाबदार आहे वारंवार सांगून देखील दुर्लक्ष करतात दर मंगळवारी विद्युत पुरवठा खंडित करू नये असे प्रकार जर घडत राहिले आणि जीवित हानी झाल्यास त्यास महावितरणचे कनिष्ठ अभियंता जबाबदार राहणार असा इशाराही त्यांनी दिला
रात्री झालेल्या जोरदार पावसात झाडांचा ताण वीजवाहिनीवर आल्याने ११ केव्हीचा विद्युत पोल कोसळल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठी दुर्घटना टळल्याची भावना सरपंचांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांलगतची धोकादायक झाडे व फांद्यांची छाटणी करण्याची मागणी केली असताना देखील दुर्लक्ष केला जातो
दरम्यान, मे महिन्यात जिल्हा परिषद सदस्य श्री नितीन राऊळ तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री वनमोरे आणि मी स्वतः असताना त्यांनी सूचना दिल्यानंतरही आवश्यक उपाययोजना का करण्यात आली नाही? तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का, असा प्रश्नही श्री पंडित उपस्थित केला

You cannot copy content of this page