Headlines

पाट हायस्कूल मध्ये सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन

कुडाळ : पाट हायस्कुल मध्ये निवती पोलीस स्टेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
याकरिता विविध एप्लीकेशन, त्याचप्रमाणे इंटरनेटवरून प्राप्त होणाऱ्या लिंक, सायबर क्राईम, येणारे मेसेजेस त्याचप्रमाणे पैशांचा फ्रॉड याबाबत मुलांना माहिती देण्यात आली. याकरिता निवती पोलीस स्टेशनचे हवालदार शामराव कांबळे आणि मारुती कांदळगावकर यांच्यासोबत आय.टी कॉम्प्युटरचे संचालक अमृत महाडिक यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांकडून उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही उत्तरे देण्यात आली. त्याचप्रमाणे सायबर क्राईमचे वाढलेली संख्या पाहता मुलांमध्ये जागृती होणे गरजेचे आहे हे पोलीस स्टेशनच्या वतीने सांगण्यात आले. पीपीटी च्या वतीने आतापर्यंत घडलेले क्राईम त्यामध्ये व्यक्ती कशी गुरफटत जाते त्याविषयी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक श्री.बोंदर सर यांनी विद्यार्थ्यांनी कायमस्वरूपी आपण स्वतः आणि घरातील व्यक्तींना याचे मार्गदर्शन करण्याची सूचना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप साळसकर यांनी केले. तर जि प सदस्या यज्ञा साळगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला संस्था सचिव विजय ठाकूर, मारुती कांदळगावकर आणि शामराव कांबळे उपस्थित होते, त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थितांचे आभार पर्यवेक्षिका अंकिता मोडक यांनी मानले.

You cannot copy content of this page