Headlines

पाट हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थ्यांतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

कुडाळ : पाट हायस्कूल मध्ये अलीकडेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये चित्रकलेच्या वहया, रंगपेटी, कलर ब्रश,मोठ्या वहया, शालेय गणवेश तसेच त्या वह्यांसाठी लागणारे कवर देण्यात आले.
या वाटपाचा लाभ 75 विद्यार्थ्यांनी घेतला. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सयाजी बोदंर कला शिक्षक श्री. संदीप साळसकर तसेच शिक्षिका जि.प सदस्या सौ. यज्ञा साळगावकर आणि पर्यवेक्षिका सौ. अंकिता मोडक सिद्धी चव्हाण प्रिया नागोळकर भक्तराज राऊळ आणि सन 1996/97 दहावी बॅच मधील माजी विद्यार्थी श्री. सतीश केरकर रघुनाथ रेडकर उपस्थित होते.
पाट हायस्कूल मधील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी आपल्या सन 1996/97 दहावी बॅच मधील ज्यांनी ज्यांनी मदत केली या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या बॅचच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही शाळेच्या हॉल साठी दीड लाख रुपयापर्यंत फॅन आणि लाईटचे व्यवस्था याकरिता मदत केली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमात या बॅचचा सहभाग असतो. विद्यालयाची गरज ओळखून आपल्या कमाईचा काही वाटा विद्यार्थ्याने जर शैक्षणिक मदतीकरिता दिला तर अगदी गरजू विद्यार्थ्यांना ते मोलाचे ठरते. पुढील काळात अशीच मदत आज शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी करावी असे संदीप साळसकर यांनी सांगितले. तर यज्ञा साळगावकर यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आपण शिक्षण घेतानाची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये तफावत असून आज शिक्षणासाठी देणारे बरेच हात आहेत त्याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घेऊन आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे सांगितले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक अंकिता मोडक यांनी केले .

You cannot copy content of this page