मीरा महादेव सामंत शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम
कुडाळ : एस.एल. देसाई पाट हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करून प्रशालेची मान उंचावली आहे. विशेष बाब म्हणजे सन२०२५-२६ मधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मीरा महादेव सामंत हिने 300 पैकी 244 गुण प्राप्त करून ग्रामीण सर्वसाधारण गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून प्रशालेचे नाव उज्ज्वल केले आहे. तसेच स्पृहा संदेश नाईक या इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनीने 300 पैकी 218 गुण मिळवून जिल्ह्यात 47 वा क्रमांक पटकावला आहे.
सन 2025 -26 इयत्ता आठवी अर्थात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आर्यन अनिल परब याने 300 पैकी 216 व महेश्वरी गिरीप्रसाद राऊळ हिने 300 पैकी 178 गुण मिळवून ग्रामीण सर्वसाधारण गटातून अनुक्रमे आठवा व एकावन्नावा क्रमांक प्राप्त केला आहे.
संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत, उपाध्यक्ष गुरुनाथ पाटकर, कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर, सचिव विजय ठाकूर, राजेश सामंत, अवधूत रेगे, सुधीर मळेकर, नारायण तळावडेकर, दीपक पाटकर, महेश ठाकूर, महाबळेश्वर कोचरेकर, शरद कोनकर या सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती प्रमुख म्हणून प्रशालेतील शिक्षिका सिद्धी गणेश चव्हाण व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्रमुख म्हणून मारुती सांगळे यांनी काम पाहिले. पाट पंचक्रोशी मधून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे कौतुक होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना गुरुनाथ केरकर, दीपिका सामंत, अंकिता मोडक, रमेश ठाकूर, सिद्धी चव्हाण, प्रियांका नागोळकर, मारुती सांगळे, विनायक कांबळे, प्रशांत जाधव, सुमती मळेकर, यज्ञा साळगांवकर, नंदिनी बुरुड यांचे मार्गदर्शन लाभले.
