उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाची मोठी हानी…

अबीद नाईक पवारांच्या आठवणीने झाले भावूक..

⚡कणकवली ता.२८-: अजित पवार यांचे आज अपघाती निधन झाले ही बातमी कळताच आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख होती. आपले त्या कुटुंबाशी नातं होतं .त्यांचा वैयक्तिक नंबर ही आपल्याकडे होता .केव्हाही त्यांना कुठल्याही प्रश्नासाठी फोन केला तर ते लगेच फोन उचलत असत. असंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक लोकांची काम त्यांच्या माध्यमातून आपण केली आहेत. पण आज त्यांच्या या अचानक जाण्यामुळे आपल्या मध्ये न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे अबिद नाईक यांनी सांगितले.
आपल्या सारख्यांना फार कठीण प्रसंगातून जावे लागणार असून आज आपल्याला अश्रू अनावर झाले आहेत. पवार कुटुंबांवर काय प्रसंग ओढवला आहे याचा विचार आपण करूच शकत नाहीत.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावेळी त्यांनी आपल्याला विचारलं, अबिद काय करू त्यावेळी त्यांनी आपल्या एका शब्दावर राजकोट किल्ला येथे येऊन भेट दिली .आपण त्यावेळी विमानतळावरून त्यांना राजकोट किल्ल्यावर घेऊन गेलो. अशा बऱ्याच आठवणी पवार साहेबांच्या असल्याचे त्यांनी सांगितले .
निधीच्या बाबतीत देखील त्यांनी कधी कमतरता भासू दिली नाही तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना ,कार्यकर्त्यांना नेहमी सन्मानाची वागणूक त्यांनी दिली पण या घटनेनंतर आपल्यावर फार कठीण प्रसंग ओडवला असल्याचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी सांगितले.त्याच्या जाण्याने फार मोठी हानी झाल्याचे त्यांनी म्हटलं

You cannot copy content of this page