Headlines

सावंतवाडीत गॅस पाईपलाईन साठी खोदण्यात आलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्याने अपघाताची दाट शक्यता…

संबंधित ठेकेदारांनी त्वरित दक्षता घेऊन उपयोजना करावी: अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मागणी ⚡सावंतवाडी ता.३१-:सावंतवाडी शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी विविध ठिकाणी रस्ते खोदण्यात आले असून, ते रस्ते अद्यापही व्यवस्थित बुजवले जात नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या खोदकामामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, एखाद्या नागरिकाला गंभीर दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.याबाबत अनेक…

Read Full News

सावंतवाडी भाजपच्या वतीने स्वतंत्र गट स्थापन..

नगराध्यक्षा सौ श्रद्धा सावंत भोसले यांची एकमताने निवड:जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सादर.. ⚡ सावंतवाडी ता.३१-:सावंतवाडी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून विजय मिळवलेल्या थेट नगराध्यक्षा तसेच अकरा नगरसेवकांनी आज अधिकृतपणे स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गट स्थापनेबाबतचे पत्र बुधवारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे सादर करण्यात आले. या गटाच्या प्रमुखपदी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले…

Read Full News

भिकेकोनाळ येथे लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचा उत्साहात समारोप…

⚡दोडामार्ग ता.३१-:लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागामार्फत भिकेकोनाळ येथे आयोजित सात दिवसीय निवासी शिबिराचा समारोप २७ डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या शिबिरामुळे गावात सामाजिक जागृतीचे वातावरण निर्माण झाले.समारोप कार्यक्रमास एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय खडपकर, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. प्रथमेश ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, प्राचार्य डॉ….

Read Full News

देवगड व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने आयोजित ‘जल्लोष २०२६’चे जल्लोषात उद्घाटन…

⚡देवगड ता.३१-:देवगड म्हणजे केवळ एक तालुका नसून निसर्गाची देणगी, हापूस आंब्याचा सुवास, समुद्रकिनारे आणि कष्टाळू माणसांची ओळख असल्याचे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले. देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेच्या वतीने आयोजित “जल्लोष २०२६” या भव्य पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साठे व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष…

Read Full News

सावंतवाडी कचरा डेपोचा प्रश्न गंभीर; पालकमंत्र्यांनी त्वरित २५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी..

संजू परब यांची मागणी; नगरसेवकांसह कचरा डेपोवर जाऊन केला स्पॉट पंचनामा.. ⚡सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी कचरा डेपो ची आज परिस्थिती पाहिली तर ती अत्यंत गंभीर आहे इकडच्या कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, अशा परिस्थितीत देखील ते काम करत आहेत, तसेच आजूबाजूच्या नागरिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तरी मी पालकमंत्री नितेश राणे याची दखल…

Read Full News

सावंतवाडी कचरा डेपोचा प्रश्न गंभीर; पालकमंत्र्यांनी त्वरित २५ एकर जागा उपलब्ध करून द्यावी…

संजू परब यांची मागणी; नगरसेवकांसह कचरा डेपोवर जाऊन केला स्पॉट पंचनामा ⚡ सावंतवाडी ता. ३१ –सावंतवाडी येथील कचरा डेपोची सद्यस्थिती अत्यंत गंभीर असून तेथील कामगारांना कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे कामगार काम करत असून परिसरातील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी या प्रश्नाची…

Read Full News

माजगावच्या प्रस्तावित कचरा डेपोला आमचा विरोध…

अमित परब: माजगाव तसेच चराठा ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेता आमचा विरोध.. ⚡सावंतवाडी ता.३१-: माजगाव सीमेवर असलेल्या हेळकर स्मशानभूमीच्या आरक्षित जागेवर ग्रामपंचायत माजगावचा कचरा डेपो करण्याचा घाट सुरू असून याला आमचा पूर्णपणे विरोध आहे अशी प्रतिक्रिया चराठा माजी उपसरपंच अमित परब यांनी दिली. दरम्यान सदर कचरा डेपो हा अत्यंविधी करण्याच्या जागेवर परिसरात होत असून त्यामुळे…

Read Full News

दोडामार्ग–विजघर रस्त्याचे काम बेकायदेशीर…

२६ जानेवारीला रस्ता रोकोचा इशारा:रविकिरण गवस.. ⚡दोडामार्ग ता.३१-: दोडामार्ग ते विजघर रस्त्याचे काम सध्या बेकायदेशीर, चुकीच्या पद्धतीने आणि जनतेला अंधारात ठेवून सुरू असल्याचा आरोप करत, अशा कामाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून तीव्र विरोध करण्यात येईल, असा ठाम इशारा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी दिला. कायदेशीर व योग्य पद्धतीने, जनतेला विश्वासात न…

Read Full News

आडारीत कोंबडी पालनाच्या शेडमधून ३० गावठी कोंबड्यांची चोरी…

⚡मालवण ता.३०-:मालवण शहरातील आडारी सातेरी मांड येथील एका कोंबडी पालनाच्या शेडमधून ३० गावठी कोंबड्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चंद्रकांत जैतापकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- आडारी सातेरी मांड येथील चंद्रकांत पांडुरंग जैतापकर यांची त्यांच्या घराशेजारीच कोंबडी पालनाचे शेड आहे….

Read Full News

दारू पिऊन वाहन चालविल्यास धडक आणि कडक कारवाई…

PI निसर्ग ओतारी:31st व न्यू इयर च्या अनुषंगाने वेंगुर्ला पोलीस अलर्ट मोडवर.. ⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला पोलीस ठाणे च्या वतीने इयर एंडिंग व न्यू इयर च्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व कोस्टल एरियात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. उद्या बुधवारी सकाळी 6 वाजता ते सायंकाळी 6 वाजता या मुदतीत ऑपरेशन विजय ही मोहीम राबविली जाणार आहे, अशी…

Read Full News

You cannot copy content of this page