Headlines

शिवसेना पदाधिकारी गुरु सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.३०-: येथील शिवसेनेचे पदाधिकारी गुरु सावंत यांचा वाढदिवस काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी श्री. सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, बांदा शहरातूनही गुरु सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात…

Read Full News

बलेनो कार अपघात प्रकरणी एकावर गुन्हा दाखल…

अपघातग्रस्त कार ब्लु डार्ट कंटेनर लूट प्रकरणातील:कारच्या धडकेत एका कारचे आणि दुकानांचे नुकसान.. ⚡कुडाळ ता.३०-: शहरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनियंत्रित भरधाव बलेनो कारने रस्त्यालगतच्या दुकानांना जोरदार धडक देत, उभ्या असलेल्या एका कारलाही धडक दिली. ही घटना शहरातील गीता हाॅटेल समोरील मुख्य रस्त्यावर घडली. या घटनेत दोन्ही गाड्यांचे तसेच एका दुकानाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी…

Read Full News

मुंबई–गोवा महामार्गावर कुरियर वाहन लुटण्याचा प्रयत्न…

गाडीवर दगडफेक आणि पाठलाग सुद्धा:कुडाळ पोलिसात सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा.. ⚡कुडाळ ता.३०-: मुंबई–गोवा महामार्गावर कुडाळजवळ मंगळवारी मध्यरात्री थरारक घटना घडली. ब्लू डार्ट सर्विसचे कुरिअर वाहन (कंटेनर) लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. ही घटना…

Read Full News

तळवडे येथे शैक्षणिक उपक्रमांमध्ये प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा संदीप गावडे यांच्या हस्ते गौरव…

⚡सावंतवाडी ता.३०-: जनता विद्यालय तळवडे येथे स्नेहसंमेलन व विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमला प्रमुख मान्यवर म्हणून संदिप गावडे उपस्थित होते यावेळी अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव श्री गावडे यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः रेखाटलेल्या चित्रकला व रंगोळी कला यांच्या प्रदर्शनाचे देखील उद्घाटन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग परिवहन विभागाचे काळे साहेब, जनता विद्यालय…

Read Full News

सावंतवाडी सहकारी पतसंस्थेच्या व्हॉइस चेअरमनपदी उमाकांत वारंग यांची बिनविरोध निवड…

संजू परब यांच्याकडून देखील अभिनंदन: विविध क्षेत्रातून देखील मान्यवरांकडून होत आहे शुभेच्छांचा वर्षाव.. सावंतवाडी ता. ३०-:सावंतवाडी सहकारी पतसंस्थेच्या व्हॉइस चेअरमनपदी उमाकांत वारंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. उमाकांत वारंग यांच्या निवडीची माहिती मिळताच सावंतवाडी येथील शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच नगरसेवक संजू परब यांनी…

Read Full News

सातोसे बस फेरी सातार्डा पर्यंत करून शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची गैरसोयी दूर करा…

उदय पारिपत्ते यांनी उभाठा शिवसेनेच्या वतीने केली मागणी: आगारप्रमुख यांना निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.३०-: येथील सावंतवाडी बस स्थानकातून सुटणारी सावंतवाडी सातोसे ही बस फेरी सातार्डा पर्यंत करुन शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोयी दूर करा अशी मागणी आज उबाठा शिवसेनेच्या वतीने सातार्डा माजी सरपंच उदय पारिपत्ते यांच्या वतीने आगारप्रमुख निलेश गावित यांच्याजवळ करण्यात आली. लवकरच…

Read Full News

पगारदार पतसंस्थांच्या समस्या सोडवा…

राज्य सहकारी फेडरेशनकडे निवेदन सादर:प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांची मागणी.. ⚡सिंधुदुर्ग दि.३०-: राज्यभरातील पगारदार पतसंस्थांना काही समस्या भेडसावत असून यावर राज्य सहकारी फेडरेशनने सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांनी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे यांची कोपरगाव (अहिल्यानगर)…

Read Full News

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्काऊट्स-गाईड शिबिर संपन्न…

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, सहकार्य व सेवाभावनेचा विकास.. ⚡सावंतवाडी ता.३०-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी कब-बुलबुल व स्काऊट्स गाईड शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिबिराची सुरुवात प्रार्थना गीत व ध्वज फडकावून करण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा, प्राचार्या प्रियंका देसाई उपस्थित…

Read Full News

कुडाळात रोटरी फेस्टिव्हलचे शानदार उदघाटन…

⚡कुडाळ ता.३०-: सरत्या वर्षांला निरोप आणि  नवीन वर्ष स्वागत करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या रोटरी महोत्सवाचे उद्घाटन कुडाळ हायस्कूल मैदानावर जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात झाले    रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित रोटरी महोत्सव 2025 चे आयोजन आजपासून.29,30 व 31 डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूल मैदानवर  करण्यात आले आहे. या महोत्सवात इंडस्ट्रियल, फूड…

Read Full News

मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदुरकरने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले…

⚡सावंतवाडी ता.३०-: मुक्ताई ॲकेडमीच्या चौदा वर्षीय साक्षी रामदुरकर हीने शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि रत्नागिरी जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त आयोजनाखाली रत्नागिरीतील डेरवण येथील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या क्रिडा संकुल येथे शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुलींच्या सतरा वर्षे वयोगटात साक्षी उपविजेती…

Read Full News

You cannot copy content of this page