Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे महिला दिन उत्साहात साजरा…

उत्कृष्ट काम केलेल्या बँक सखींचा करण्यात आला खास सत्कार.. ⚡ओरोस ता.०८-: सिंधुदुर्ग महिला दिनाचे अवचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. हर्षदा प्रसाद देवधर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिला दिन कार्यक्रम सोहळ्यास बँकेच्या संचालिका सौ. प्रज्ञा ढवन, जिल्हा बँकेचे…

Read Full News

मालवण नगरपालिकेत पाककला व ‘खेळ पैठणी’ स्पर्धेतून महिला दिन उत्साहात साजरा….

⚡मालवण ता.०८-:स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा आणि तिच्या कर्तुत्वाला सलाम करण्याचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन होय. मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने आज महिला दिनाच्या निमित्ताने पाककला आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करुन महिलांच्या कल्पकतेचा, सृजनतेचा आणि एकतेचा असा सुंदर मिलाफ घडवून आणला आहे, असे प्रतिपादन मालवणच्या नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी येथे बोलताना…

Read Full News

आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत द्यावी…

आबा बागायतदारांच्या १२ मार्चच्या मोर्चाला जिल्हावासियांचा पाठिंबा;नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती.. ⚡कणकवली ता.०८-: अस्मानी संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी कधी नव्हे एवढा अडचणीत आला आहे. लाखो रुपये खर्च केलेल्या आंबा बागायतीमधून उत्पादन खर्च सोडाच उलट खर्च केलेले पैसेही मिळणे कठीण आहे. शासनाने या बागायतदार, शेतकऱ्यांना मरीव मदत द्यावी, या मागणीसाठी गुरुवार १२ मार्च…

Read Full News

कृषी दर्जा मिळाल्याने मच्छिमारांनाही कर्जमाफी द्यावी…

देवगड फिशरमेन्स सोसायटीच्या बर्फ कारखान्याच्या व्याजात सवलतीची मागणी… ⚡देवगड ता.०८-: मच्छिमारी व्यवसायाला राज्य शासनाने कृषी दर्जा दिल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना, सवलती व कर्जमाफीचा लाभ मच्छिमारांनाही देण्यात यावा, तसेच देवगड फिशरमेन्स को-ऑप. सोसायटीच्या बर्फ कारखान्यावरील कर्जाच्या व्याजात भरीव सवलत देण्यात यावी, या मागणीसाठी देवगड येथील मच्छिमारांनी पालकमंत्री मा. नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर…

Read Full News

कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०८-: कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. १०० फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने भाविकांनी दगडांचा मारा केला. हजारो भाविकांनी याची देही, याची डोळा या चित्तथरारक उत्सवाची अनुभूती घेतली. रोंबाट, वाघ शिकार, घोडेमोडणी हे विशेष आकर्षण ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कर्नाटक या राज्यातील भाविकांच्या उपस्थितीत हा हुडोत्सव मोठ्या जल्लोषात…

Read Full News

नेरूर गावच्या पर्यटन विकासात बचत गटांचे मोठे योगदान…

रुपेश पावसकर:माणकादेवी शाळेत महिला दिन साजरा.. ⚡कुडाळ ता.०८-: तालुक्यातील नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान आहे. भविष्यात त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांच्या ग्रामसंघाच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील,  असे प्रतिपादन नेरूर जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य रुपेश पावसकर यांनी जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात शनिवारी (ता…

Read Full News

ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

हर्षाली वेंगुर्लेकर, ईशा शिरोडकर, श्रेया मांजरेकर, सिद्धी फोपळे, अनुष्का कदम, भारती आचरेकर यांची बाजी.. ⚡मालवण ता.०८-: ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने महिला दिनानिमित्त आणि स्व. नेहा कोळंबकर – शंकरदास यांच्या स्मरणार्थ मालवण येथे आयोजित केलेल्या महिलांसाठी ग्लोबल रक्तविरांगना मिनी मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विविध गटातून हर्षाली…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीकडून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा…

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीकडून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाककला स्पर्धा, स्वसंरक्षण मार्गदर्शन, फनी गेम्स आदींसह विविध उपक्रम राबविण्यात आले‌. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.‌ येथील बॅ. नाथ पै सभागृहात नारीशक्तीचा जाग करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी व…

Read Full News

सावंतवाडी पोलिस ठाण्यात महिला दिन उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. महिला पोलिस ठाणे ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणली. यावेळी नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील उपस्थित होत्या. सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या प्रांगणात महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांनी केली नुकसानग्रस्त आंबा बागांची पाहणी…

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार:पालकमंत्री नितेश राणे.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी सध्या निसर्ग आणि हवामान बदलामुळे मोठ्या संकटात सापडले असून आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील आंबा बागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न…

Read Full News

You cannot copy content of this page