जनतेच्या हितासाठी गुन्हा अंगावर घेण्यास तयार

संजू परबांच्या धमक्यांना भीक घालत नाही शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा सावंतवाडी-: नगराध्यक्ष संजू परब जर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असतील तर जनतेच्या हितासाठी आम्ही गुन्हे अंगार घेण्यास तयारआहोत, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही,असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांना शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिलाआहे ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊळ…

Read More

‘आरोस विद्या विकास’मध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद…

एक दिवस आड करून नववी, दहावी वर्ग सुरू बांदा दि.२५-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ ते साडेआठ महिने बंद असलेल्या आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलची पालकांच्या सहमतीने अखेर घंटा वाजली. नववी व दहावी वर्ग एक दिवस आड करून सर्वतोपरी काळजी घेऊन सुरू करण्यास पालकांनी मान्यता दिल्याचे प्रभारी मुख्याध्यापक विद्याधर देसाई यांनी सांगितले. तसेच दोन दिवसांत विद्यार्थ्यांचा…

Read More

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडले तब्बल ३५ लाखांची रोकड लंपास अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू

*💫सिंधुदुर्गनगरी दि. २५* सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयात मंगळवारी रात्री झालेल्या धाडशी चोरित तब्बल ३५ लाख रुपये अज्ञात चोरटयांनी लंपास केले आहेत. सुरुवातीला नेमकी कोणत्या प्रकारची चोरी झाली ? हे स्पष्ट होत नव्हते. परंतु पोलिसांच्या प्राथमिक तपासात ३५ लाख रुपये गेल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात खळबळ माजली आहे. सिंधुदुर्गनगरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read More

कोणत्याही परिस्थितीत आम्ही तो स्टॉल काढणारच…नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा

* *💫सावंतवाडी दि.२४-:* शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ सांगतात आम्ही नगरपालिकेच्या काचा फोडणार, दिपक केसरकर यांच्या कार्यकर्त्यांची हीच संस्कृती आहे, का असा सवाल करत भाजपचे कार्यकर्ते पळणारे नाहीत. त्यामुळे आम्ही हा स्टाॅल कोणत्याही परिस्थितीत काढणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परब म्हणाले, गेली अनेक वर्षे जाधव नामक युवक अनाधिकृत स्टॉल लावतात. मात्र आम्ही…

Read More

सिंधुदुर्गनगरी येथील आरटीओ कार्यालयात चोरी

सिंधुदुर्गनगरी पोलीस घटना स्थळी दाखल : चोरी नेमकी कोणत्या प्रकारची हे अद्याप अस्पष्ट सिंधुदुर्गनगरी ता २५ : सिंधुदुर्गनगरी येथील आरटीओ कार्यालयात चोरी झाल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी रात्री ही चोरी झाल्याचे बोलले जात आहे. सिंधुदुर्गनगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरु आहे. मात्र, नेमकी कोणत्या प्रकारची चोरी झाली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read More

स्वतः च्याच बैलाने हल्ला केल्याने युवक जखमी

*माणगाव डोलकरवाडी येथील घटना सावंतवाडी दि.२५-:* माणगाव डोलकरवाडी येथे स्वतः च्याच बैलाने हल्ला केल्याने बैल मालक योगेश सावंत (३०) हा युवक जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी नागरिकांनी सावंतवाडी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read More

सावंतवाडी येथे भात खरेदीचा शुभारंभ

शेतकऱ्यांना मिळणारी बोनस रक्कम वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे रुपेश राऊळ यांनी दिले आश्वासन सावंतवाडी दि.२५-:* शासकिय आधारभूत किंमत भात खरेदी योजना सन २०२०-२१ अंतर्गत भात खरेदी शुभारंभ खरेदी-विक्री संघाचे सभापती श्री.बाबल ठाकूर यांच्या हस्ते सावंतवाडी येथे करण्यात आला. शेतकऱ्यांना मिळणारी बोनस रक्कम वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश…

Read More

ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे निधन,….

पहाटे घेतला अखेरचा श्वास *💫नवी दिल्ली दि.२५-:* काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. अहमद पटेल यांना मेट्रो रुग्णालयातून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, यांना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांनी स्वत:च ट्विट करून याबाबतची माहिती…

Read More

प्रताप सरनाईक आणि वायकर हे मुखवटा,खरा कलाकार कलानगरमध्ये बसलाय – नितेश राणे

*💫कणकवली दि.२४-:* मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक त्याच भुयारी गटार जात कलनागरमध्ये. अजून थोडा ईडीचा तपास खोलात जाऊन झाला आणि भुयारी गटारातून ते गेले तर थेट कलानगरमध्ये पोचतील. मुख्य सूत्रधार हा कलनागरमध्ये बसला आहे,अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करत निशाणा साधत केली. कणकवली येथे त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. शिवेसना…

Read More

सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज उभारणी खर्चाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार *💫सिंधुदुर्ग दि.२४-:* ओरोस येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या खर्चाचा ९६६.०८ कोटींचा प्रस्ताव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभाग, व वैद्यकीय शिक्षण या दोन्ही विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय…

Read More
You cannot copy content of this page