Headlines

कणकवली शहरातील नागरिकांसाठी उद्या कोव्हीशिल्डचे स्वतंत्र ४०० डोस ​

नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती ​कणकवली 7 सप्टेंबर (प्रतिनिधी)- ​कणकवली शहरासाठी देखील कोव्हीशिल्ड लसीचे स्वतंत्र ४०० डोस उपलब्ध होणार आहेत. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीनुसार संजना सावंत यांनी कणकवली शहराकरिता स्वतंत्र ​४०० डोस उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून, त्याची अंमलबजावणी बुधवार ​८ सप्टेंबर…

Read More

संततधार पडत असलेल्या पावसामुळे कळसुली-हर्डी रोडवर दरड कोसळली

*⚡कणकवली ता.०७-:* कळसुली-घोडगे रोडवर हर्डी सातनाका वळणावर बीएसएनएल टॉवर नजीक संततधार पडत असलेल्या पावसाने कळसुली सातनाका येथील दरड कोसळून कळसुली-घोडगे रस्त्यावर दगड माती आली आहे. दोन दिवसांपूर्वी दरड थोडी थोडी कोसळत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. कळसुली गावात भुस्खलन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळेच दरड कोसळली असावी, अशी चर्चा कळसुली गावात आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव…

Read More

खा विनायक राऊत उद्या जिल्हा दौऱ्यावर

ओरोस-:रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव खा विनायक राऊत हे ८ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुधवार दिनांक ८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.४५ वाजता सिंधुदुर्ग एअरपोर्ट (चिपी) येथे भेट देणार आहेत. दुपारी १ वाजता कोचरा (ता.वेंगुर्ला) बीएसएनएल टॉवर लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती लावणार आहेत. सायंकाळी ५ वाजता मल्हार पूल…

Read More

भाजपाने सिंधुदुर्गात उभारलेल्या कोविड केंद्रांचे 9 सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण

कोकणवासीयांना दिलेला शब्द खरा केला:आम.प्रसाद लाड *⚡कणकवली ता.०७-:* कोविड साथरोगाचा संसर्ग वाढला असताना कोकणवासीयांना दिलेला शब्द खरा करत भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी ४ व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ३ कोविड-१९ केंद्रे उभारली असून त्यांचा भव्य लोकार्पण सोहळा रत्नागिरी येथे ८ सप्टेंबर व सिंधुदुर्गात ९ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. भाजप आणि ‘अंत्योदय प्रतिष्ठान’च्या माध्यमातून उभारलेल्या या सुविधांमुळे…

Read More

शिवसेनेचा कोकणी माणसाबाबत दुजाभाव कशासाठी?आम.प्रसाद लाड यांचा सवाल

पालकमंत्र्यांकडून कोकणवासीयांचा दिशाभूल *⚡कणकवली ता.०७-:* गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा उत्सव आहे,त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार ते पाच लाख चाकरमानी दाखल होतात. मात्र त्यांना कडक नियम लावले जात आहेत, रेल्वे स्टेशनवर आणि सीमा नाक्यांवर त्यांची कसून चौकशी केली जाते. पालकमंत्र्यांच्या या निर्णयाचा मी निषेध करतो. पालकमंत्र्यांनी काल सांगितले एक पण आता रेल्वे स्थानकांवर गर्दी बघा.शिवसेनेचे नेते…

Read More

शहरातील नागरिक राहत आहेत लसीकरणापासून वंचित

सेनेच्या नगरसेवकांनी घेतली वैद्यकीय अधीक्षकांची भेट;नगरपालिकेच्या दवाखान्यात लसीकरण सुरू करण्याची केली मागणी *⚡सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शहरा बाहेरून नागरिक येऊन लस घेत असल्याने शहरातील नागरिक लासिकरणापासून वंचित आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी पालिकेच्या दवाखान्यात लसीकरण मोहीम हाती घेण्यात यावी अशी मागणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ उत्तम पाटील यांची भेट घेऊन शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती….

Read More

मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गसाठी पुन्हा ६६ हजार कोविड लसींचे डोस प्राप्त

आमदार वैभव नाईक यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.०७-:* गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा ६६ हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात करण्यात आला आहे.अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी ज्यादा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आ.वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री…

Read More

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सांस्क्रुतीक विभाग सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रविण वरुणकर

*⚡कणकवली ता.०७-:* कणकवली तालुक्यातील तळरे येथील प्रविण वरुणकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सांस्क्रुतीक विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सांस्क्रुतीक विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रविण वरुणकर यांची नियुक्ती सांस्क्रुतीक विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षा सौ .विद्याताई कदम यांच्या सुचनेनुसार म. प्र. काँग्रेस कमिटीच्या सांस्क्रुतीक विभागाचे सरचिटणीस आणि राज्य समन्वयक सम्राट साळवी तसेच उपाध्यक्ष व…

Read More

पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ कमी करा

अन्यथा शिवसेना आंदोलनात्मक भूमिका घेणार; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर *⚡सावंतवाडी ता.०७-:* पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ कमी करण्या संदर्भात शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा येथील शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना निवेदनद्वारे देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे कि शासन तथा केंद्र शासनाकडे आमच्या भूमिका पोहोचवा सध्या कोरोना…

Read More

खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या पहिल्या ट्रेनचे शानदार स्वागत

खारेपाटण दशक्रोशीसह ६० गावातील नागरिकांना रेल्वे स्टेशनचा होणार फायदा *⚡कणकवली ता.०७-:* खारेपाटण सह आजूबाजूच्या ४० ते ६० गावांना फायदेशीर व सोयीचे ठरणारे बहुचर्चित व प्रलंबित असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारा वरील चिंचवली येथील कोकण रेल्वेचे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनवर प्रथमच सावंतवाडी – दिवा पॅसेंजर गणपती स्पेशल गाडी थांबविण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जि प अध्यक्ष सौ. संजना…

Read More
You cannot copy content of this page