⚡कणकवली ता.०७-:
बजरंग दलातर्फे १ ते ७ जुलै सेवा सप्ताह राबविण्यात आला. या अंतर्गत सोमवारी जानवली मारूती मंदिर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग विभाग संयोजक दत्तप्रसाद ठाकूर, तालुका संयोजक नागेश मोगवीरा, अभि राणे, अमोल रासम, अमित मयेकर, शुभम तावडे, शंकर जंगम, निकेतन राणे, विश्व हिंदू परिषदेचे सुनील सावंत, नंदकुमार आरोलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किशोर दाभोलकर, जानवली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
बजरंग दलातर्फे जानवली येथे वृक्षारोपण…
