⚡बांदा ता.०७-: बांदा उभाबाजार येथील गिरीश गंगाधर नाटेकर (वय56) यांचे सोमवारी दि. 7 जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजता गोवा बांबोळी येथे हृदयविकाराने दुःखद निधन झाले . दुपारी बांदा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,भाऊ,दोन विवाहीत बहीणी, वहिनी, पुतण्या असा परिवार आहे. ते पुर्वीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते, शिवसेना शहरप्रमुख होते तसेच अयोध्येतील श्री राम मंदिर कारसेवेतही ते सहभागी झाले होते. त्यांच्या अकाली निधनाने बांद्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गिरीश नाटेकर यांचे हृदयविकाराने दुःखद निधन…
