स्मार्ट मीटर आणि गवे रेड्यांकडून शेती नुकसानीवर चर्चा होणार:अतुल बंगे आणि अमृत देसाई यांचे उपस्थित राहण्याबाबत आवाहन..
कुडाळ : स्मार्ट प्रीपेड मिटर विरोधात आणि शेतीची नासधूस करणाऱ्या गवा रेड्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी १० जुलै सकाळी ११ वाजता वालावल-हुमरमळा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला वीजग्राहक आणि शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी प स सदस्य अतुल बंगे आणि हुमरमळा सरपंच अमृत देसाई याणी केले आहे.
सध्या स्मार्ट मिटर गुपचूप बसवून भरमसाठ बिले ग्राहकांना येत आहेत. यामुळे विज ग्राहकांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली असुन हे स्मार्ट मिटर काढुन टाकुन आमचे जुनेच मिटर बसवावेत या मागणीसाठी विचार विनिमय करण्यासाठी माड्याची वाडी, पाट, आंदुर्ले, हुमरमळा या गावातील विज ग्राहकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याच बरोबर हुमरमळा वालावल गावातील तसेच चेंदवण पडोसवाडी येथील शेतकऱ्यांची शेती गव्या रेड्यांनी नासधूस केली या वर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी सुद्धा याच बैठकीत चर्चा होणार आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य अतुल बंगे, हुमरमळा वालावल सरपंच अमृत देसाई यांच्या उपस्थितीत हुमरमळा वालावल येथील श्री रामेश्वर मंगल कार्यालय कार्यालयात (प्रविण मार्गि) १० जुलै रोजी सकाळी १० वाजता हि सभा होणार आहे. या सभेस विज ग्राहक आणि शेती नुकसान झालेल्या शेतकरी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पाट येथील विज ग्राहक प्रथमेश परब व हुमरमळा वालावल करमळीवाडी येथील शेतकरी किशोर वालावलकर यांनी केले आहे.