⚡सावंतवाडी ता.०८-: दिनांक 3 व 4 जुलै रोजी वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या मुलींच्या व मुलांच्या पंधरा व सतरा वर्षाखालील फुटबॉल संघाने यश संपादन केले आहे. या स्पर्धेत पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात शालेय संघाने द्वितीय क्रमांक तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात शालेय संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
त्यांच्या या यशासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. त्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक शेरॉन अल्फान्सो आणि हितेश मालणकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे मुख्याध्यापक रे . फादर रिचर्ड सालदाना तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.