तालुक्यातील कोरोना रुग्णांची मृत्यू संख्या ४१ वर*
सावंतवाडी दि.२५-:* तालुक्यात आज दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मळगाव व देवसू येथील हे दोघे असून दोघांवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. परंतु आज दिवसभरामध्ये तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आला नाही. याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. सावंतवाडी तालुक्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. मळगाव मध्ये अलीकडेच एकाच घरातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते यापैकी सुरुवातीला आढळून आलेल्या 59 वर्षीय व्यक्तीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला तर देवसू येथे पॉझिटिव्ह आलेल्या 66 वर्षीय व्यक्तीवर ओरोस जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते त्याचाही आज मृत्यू झाला. या दोघांच्या मृत्यूचा आकडा पकडून आत्तापर्यंत तालुक्यामध्ये 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 746 आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यापैकी 638 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर अजूनही 46 जण ऍक्टिव्ह आहेत. आज मृत्यू झालेल्या दोघांवरही ओरोस येथे नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.