वैभववाडी तालुका सामाजिक संस्थेच्या गणेशोत्सव आरती संग्रहाचे मुंबई प्रकाशन
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रकाशन *⚡वैभववाडी ता.०२-:* वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी तालुका सामाजिक संस्थेने गणेशोत्सव निमित्त गावा-गावात आरती संग्रह वाटपाचे आयोजन केले आहे. या आरती संग्रहाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड कार्यालयात मनसे नेते श्री.अमितसाहेब राजसाहेब ठाकरे, नेते श्री.शिरीष सावंत साहेब, सरचिटणीस श्री.परशुराम(जीजी) उपरकर साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला….
