सुमो गाडी चोरी प्रकरणातील मुख्य संशयितास सांगली येथून अटक…..

▪️सांगली स्थानिय गुन्हा अन्वेषण पथक व कुडाळ पोलीस पथकाची संयुक्त कामगिरी;कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली माहिती

💫कुडाळ दि.१८-: सुमो चालकाला मारहाण करीत त्याच्याकडील मुद्देमालासह सुमो गाडी चोरून नेणाºया तीन चोरट्यांपैकी गेले वर्षभर फरार असलेल्या मुख्य संशयित चोरटा पैगंबर शेख (रा. सांगली) याला सांगली स्थानिय गुन्हा अन्वेषण पथक व कुडाळ पोलीस पथकाने सांगली येथुन ताब्यात घेत अटक केली. त्याला ओरोस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.

२६ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री रुपेश आजवेलकर (रा. कणकवली) हे सुमो गाडी घेऊन कणकवलीच्या दिशेने जात असताना पत्रादेवी येथे तीन व्यक्तींनी त्यांच्या सुमो गाडीला हात दाखवित कसालपर्यंत सोडण्याची विनंती करून ते त्यांच्या गाडीत बसले. या दरम्यान कुडाळच्या जवळ गाडी आली असता त्यातील एकाने उलटी होत असल्याचे सांगून गाडी थांबवा, असे सांगितले. त्यामुळे आजवेलकर यांनी गाडी थांबवली . यावेळी त्यातील दोघांनी चालकाला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम हिसकावुन घेत त्याला गाडीतुन बाहेर काढले. त्यानंतर ते सुमो घेवुन सावंतवाडीच्या दिशेने पळुन गेले होते. या प्रकरणी कुडाळ पोलीस अधिक तपास करताना हे चोरटे गाडी चोरून नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज आंबोली येथे मिळाले. त्यामुळे या चोरट्यांचा कोल्हापुर व बेळगाव येथे शोध तेथील स्थानीक पोलिसाच्यां मदतीने घेतला जात होता. दरम्यान चोरीतील जत, सांगली येथील राजीव बसप्पा नरूटे (२२) इराण्णा उर्फ राहुल अप्पासो बिराजदार (२२) दोन संशयित चोरट्यांना कर्नाटक पोलिसांनी पकडले होते. त्यांना त्यावेळी कुडाळ पोलिसांनी ही अटक केली होती. मात्र या वाहन चोरीतील मुख्य संशयित पैंगबर शेख हा फरार होता. त्याचा शोध कुडाळ पोलीस घेत होते. या दरम्यान मंगळवारी सांगली स्थानिय गुन्हा अन्वेषण पथक व कुडाळ पोलीस पथकाने संयुक्तरित्या सांगली येथे पैंगबर शेखला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली असुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

You cannot copy content of this page