राज्य शासनाच्या सूचनांनुसार गोवा सीमेवर उद्यापासून कार्यवाही होणार

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी-:* कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, मिशन बिगीन अगेन अंतर्गत, राज्य शासनाने दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 25 नोव्हेंबर 2020 रोजी पासून गोवा राज्याच्या सीमेवर कार्यवाही सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी…

Read More

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी पुंडलीक दळवी यांची निवड…

सावंतवाडी दि.२४-:* राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी पुंडलिक दळवी यांची प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील यांनी केली निवड. गेले काही महिने रिक्त असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदावर पुंडलिक दळवी यांच्या नावाची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील यांनी करून एका तरूण कार्यकर्त्यांला संधी दिल्याने सावंतवाडी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत चैतन्य पसरलेले आहे.

Read More

कणकवलीत भाजपला भगदाड….

कणकवली दि.२४-:* भाजपचे पंचायत समिती शक्तीकेंद्र अध्यक्ष राजन नानचे, भाजप युवामोर्चा तालुका सरचिटणीस पवन भोगले, संजय नानचे, बापु गोसावी यांच्यासह अनेक भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुणभाई दुधवडकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत फोंडा येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री.अरुण दुधवडकर यांनी उपस्थित प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले…

Read More

सावंतवाडी पालिकेने हटविलेले ते स्टॉल शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस ने पुन्हा उभारले

जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील सेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांचा इशारा *💫सावंतवाडी दि.२४-:* संत गाडगेबाबा मंडई येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविलेला स्टॉल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व नागरिकांनी त्याठिकाणी जात तो स्टॉल पुनश्च उभारला.सोमवारी संत गाडगेबाबा मंडई येथील स्टॉल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले. यावेळी नगरपालिका…

Read More

कोविड उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणेला राज्यात सर्वप्रथम निधी देणारे वैभव नाईक एकमेव आमदार-: हरी खोबरेकर

*कोविड उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणेला राज्यात सर्वप्रथम निधी देणारे वैभव नाईक एकमेव आमदार *💫मालवण दि.२४-:*कोविड १९ उपाययोजनेसाठी आरोग्य यंत्रणेला राज्यात सर्वप्रथम कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी २५ लाख रु चा निधी दिला आहे. आमदार स्थानिक विकास निधीतून राज्यात सर्वप्रथम निधी देणारे ते एकमेव आमदार आहेत.२८ मार्च २०२० रोजी आमदार वैभव नाईक यांनी हा निधी आरोग्य…

Read More

२६ नोव्हेंबर रोजी सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप

प्राथमिक शिक्षक भारती संघटना होणार संपात सहभागी;जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली माहिती *💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* २६ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संपात प्राथमिक शिक्षक भारती संघटनां सहभाग घेणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यानी दिली. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या आदेशान्वये शासनाच्या कर्मचारी विरोधी…

Read More

महाविकास आघाडीचे नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू

*सावंतवाडी दि.२४-:* सोमवारी संत गाडगेबाबा मंडई येथील स्टॉल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हटविल्याने महाविकास आघाडीने नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. यावेळी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

Read More

मालवण तालुक्यात केवळ ११ शाळाच झाल्या सुरू

एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ *💫मालवण-:* शासनाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिल्यानंतर या आदेशानुसार आज मालवण तालुक्यात ३६ शाळांपैकी केवळ ११ शाळा सुरू झाल्या. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रखडलेले कोरोना तपासणीचे अहवाल, पालकांनी शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यासाठी न दिलेले संमतीपत्र, परगावी गेलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना तपासणीस दाखविलेली अनुपस्थिती या कारणांमुळे…

Read More

वाढीव वीजदर व सक्तीच्या वसुली निषेधार्थ विजबिलांची होळी

भाजपाचे वैभववाडीत वीज वितरण विरोधात आंदोलन *💫वैभववाडी दि.२३-:* लाॕकडाऊनच्या काळातील वीज बीले माफ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते.माञ आता ही बीलांची वसुली केली जात आहे.राज्य सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे.याचा निषेध म्हणून तालुका भाजपच्यावतीने वीज वितरण कार्यालयासमोर वीज बीलांची होळी करण्यात आली.यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी तालुक्यातील समस्यांवरुन वीज वितरणच्या…

Read More

नैसर्गिक गॅस जोडणीचा कुडाळ येथे नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या हस्ते शुभारंभ

*💫कुडाळ दि.२३-:* कुडाळ शहरात नव्याने सुरु होत असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीच्या नॅचरल गॅस प्रकल्पामुळे शहरवासीयांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असून, अशा प्रकारे नॅचरल गॅस हा पाईप लाईनद्वारे घरोघरी पोहोचणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात घरोघरी नॅचरल गॅस पाईपलाईन जोडणीचे काम सुरु झाले आहे. याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष ओंकार…

Read More
You cannot copy content of this page