प्राथमिक शिक्षक भारती संघटना होणार संपात सहभागी;जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली माहिती
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२४-:* २६ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एक दिवसाचा लाक्षणिक संपात प्राथमिक शिक्षक भारती संघटनां सहभाग घेणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यानी दिली. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या आदेशान्वये शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा पाडाव व्हावा म्हणून राज्यात सातत्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे. २ ऑक्टोबरच्या भव्य परिषदेत दहा प्रमुख राष्ट्रीय संघटनांनी सहभाग घेतला होता. या परिषदेला अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत केंद्र व राज्य सरकारांच्या कामगार शेतकरी आणि शिक्षक-शिक्षकेतर विरोधी धोरणांना पायबंद घालण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षक भारती ही प्राथमिक शिक्षक संघटनां या एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होणार आहे, असे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यानी सांगितले.