जनतेच्या हितासाठी गुन्हा अंगावर घेण्यास तयार

संजू परबांच्या धमक्यांना भीक घालत नाही शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा

सावंतवाडी-: नगराध्यक्ष संजू परब जर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असतील तर जनतेच्या हितासाठी आम्ही गुन्हे अंगार घेण्यास तयारआहोत, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही,असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांना शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिलाआहे ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राऊळ म्हणाले, सावंतवाडी नगरपालिकेच्या नगरसेवकांनी एक स्टॉल धारकावर कारवाई केली होती, त्याचा जाब विचारणासाठी आम्ही काल नगरपालिका कार्यालयात धडक दिली. यावेळी आम्ही मुखाधिकारी यांची भेट गेलो, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारे मुख्याधिकारी यांनी भेट दिली नाहीआम्हाला फक्त त्या स्टॉल धारकाला न्याय द्यायचा होता. एक सुशिक्षित स्टॉल धारकावर पालिकेने अन्याय केला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वागणूकीने भाजप शहरात वागत असेल तर येणाऱ्या काळात भाजपला धोक्याची घंटी असल्याचेही त्यांनी सांगितले. मुखाधिकारी यांचे आदेश नसताना जर नगराध्यक्ष कारवाई करणार असे सांगत असतील तर ही दुर्दैवी गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page