सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांचा इशारा
*💫सावंतवाडी दि.२५-:* मळगाव निरवडे न्हवेली आरोंदा रस्ता हा पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण हे 2018 – 19 मध्ये मंजूर झालेली आहे. मात्र या डांबरीकरणाच्या कामाला अद्यापपर्यंत प्रत्यक्षरीत्या सुरुवात झालेली नाही. रस्त्यावर पडलेले खड़े यामुळे दिवसेंदिवस या मार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यापूर्वी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग ला रस्त्याच्या डांबरीकरणाचे बाबत निवेदन देऊन डांबरीकरणाचे काम सुरू करावे अशी आपल्या मागणी केली होती. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात काही ठिकाणी खड्डे बुजविणे व डांबरीकरणाचे काम झाले होते. मात्र आता पावसाळा उलटला असून या मार्गावरील खडपांचे प्रमाण याढल्याने वाहनपारक व रुग्णांना त्रासदायक ठरत आहे. रस्त्यावर पडलेल्या बायांमुळे वाहनधारकांना व प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास होत असून हाडांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे वाहनधारक व प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी ही अपघातास कारणीभूत ठरत आहे. यामुळे ही झाडे तोडणे अतिशय महत्वाचे आहे. तरी सावंतवाडी मळेवाड आरोंदा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम व दुतर्फा पडलेली झाडी तोडण्याचे काम आठ दिवसात सुरू करावे अन्यथा आपल्या कार्यालयाच्या फलकाला हाडांच्या एक्स-रे ची माळ घालून आपल्या सावंतवाडी येथील कार्यालयासमोर दिनांक 2 डिसेंबर 2020 रोजी सकाळी दहा वाजता वाहन धारक, प्रवासी, त्याचप्रमाणे सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष यातील जे सहकार्य करतील त्यांना सोबत घेऊन एक्स रे उपोषण छेडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री माने यांना निवेदन देऊन दिला आहे.