वाढीव विजबिलाविरोधात ठाकरे सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा मोर्चा

मनसे नेते परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजन

कुडाळ तालुका तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली माहिती*

*💫कुडाळ दि.२५-:* राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जनतेचा आक्रोश व व्यथा राज्यकर्त्यांसमोर पोहोचवण्यासाठी या सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उद्या गुरुवार २६ नोव्हेंबर रोजी पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मनसे कुडाळ तालुका तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी.दिली आहे देशात कोरोना विषाणू आपत्कालीन कालावधी चालू झाल्यापासून जवळपास आजपर्यंत संपूर्ण अर्थव्यवस्था व जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वसामान्य जनता जगण्यासाठी अक्षरशः संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत संचारबंदी कालावधीतील लाईट बिलांची महावितरणने अवास्तव व वाढीव आकारणी करून जनतेच्या माथी मारण्याचे काम केले आहे. शिवाय ठप्प कामकाजामुळे होरपळलेल्या जनतेकडून बेकायदेशीरपणे वसुली करण्याचे आदेश महावितरणला दिलेले आहेत. वास्तविक यापूर्वी यासंदर्भात मनसेच्या माध्यमातून निवेदने व आंदोलनाचा इशारा झाल्यानंतर राज्य सरकारकडून बिलाबाबत पुनर्विचार करून जनतेला निर्धास्त करण्याचा शब्द मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांनी दिलेला होता परंतु याबाबत आता ठाकरे सरकारच्या या सर्वच मंत्र्यांनी यु टर्न घेऊन जनतेकडून अवाजवी लाईट बिल वसुली करण्याचे चक्क फर्मनच देऊन टाकले आहे. याविरोधात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे आदेशानुसार जनतेचा आक्रोश व व्यथा राज्यकर्त्यांसमोर पोहोचवण्यासाठी या सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्या गुरुवार दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांचे नेतृत्वाखाली धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता जन आक्रोश मोर्चा ओरोस सिडको भवनाकडून चालू होऊन पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.तरीही या ज्वलंत सामाजिक लढ्यात जनतेनेही उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहनही प्रसाद गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page