राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्रच्यावतीने आयोजन*
*💫सावंतवाडी दि.२५-:* भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद महाराष्ट्रच्यावतीने उद्या २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत पुणे येथील प्रसिध्द व जागतिक कितीर्चे विचारवंत लेखक आणि भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा. हरी नरके यांचे ‘भारतीय संविधान परंपरा व परिवर्तनाचा मेळ घालणारा दस्तऐवज’ विषयावर आॅनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान फेसबुक आणि युट्युबवर आॅनलाईन राज्यशास्त्र परिषदेच्यावतीने प्रसारित होणार आहे संविधान दिनाच्या निमित्ताने राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत आणि संविधानाचे अभ्यासक यांना प्रा. हरी नरके मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या उपक्रमात सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यशास्त्र परिषदेचे राज्य अध्यक्ष प्रा. सुमित पवार,राज्य सचिव डॉ. पितांबर उरकुडे , प्रा. भगवान चौधरी, प्रा. सुरेश नारायणे, प्रा. शरद जोशी, स्मिता जयकर, प्रा. सुनील राठोड, कोकण विभागीय अध्यक्ष, प्रा. दशरथ सांगळे, महासचिव प्रा. विजय सावंत व सर्व राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे.