भाजप जिल्हा सहसचिव संजय नाईक यांची तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे मागणी
*💫सावंतवाडी दि.२५-:* ग्रामीण भागातील बेकार कामगार, मजूर किंवा पेशंट वर्गातील नागरिकांची कोरोना काळात बिकट अवस्था झाली आहे. कोविंड-१९ रोखण्यासाठी प्रयत्न असावेत, पण शासनाने गोव्यातून ये-जा करणाऱ्यांसाठी ओळखपत्रे ही स्थानिक ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालय येथे उपलब्ध द्यावीत, तसेच यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता कोणत्या स्वरुपात असावी हे पण जाहिर करावे अशा मागणीचे पत्र भाजप जिल्हा सहसचिव संजय नाईक यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा व सीमावाी असंख्य नागरिक हे गोव्यात रोजगारासाठी जात असतात. काही ठराविक नागरिक रोजंदारीसाठी जाणारे आहेत त्यांच्याकडे कामाचे सबळ पुरावे नाहीत अशांचा पण विचार करावा. व्यवसाय, बांधकाम, रंगकाम, गार्डनर, घरकाम अशा लोकांना पण पास उपलब्ध करुन द्यावेत अशीही मागणी केली आहे. एकतर सीमा भागात उद्योगधंदे नाहीत त्यामुळे लोकांनी पूर्णपणे गोव्यावरच अवलंबून राहायचे आणि अशा लोकांना ओळखपत्र न मिळाल्यास उपासमारीची वेळ येवू शकते. म्हणूनच रोज ये-जा करणान्याबरोबर इतरही कामासंदर्भात जाणा ऱ्या-येणाऱ्या किंवा दवाखान्यात पेशंट घेऊन जाताना कोणत्याही प्रकारची आडकाठी येवू नये यासाठी सुद्धा व्यवस्था करावी असे नाईक आपल्या निवेदनात म्हणाले आहेत.