*💫सावंतवाडी दि.२५-:* ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांना कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल ‘दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड कोविड योध्दा २०२०’ मुंबई येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या चित्रपट सृष्टीतील कलाकार, मिडिया क्षेत्रातील संपादक, पत्रकार, संशोधक, एनजीओ आदी क्षेत्रातील व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार बहाल करुन सन्मानित करण्यात येत आहे. वेंगुर्लेकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्याचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. बँकॉक येथील अभ्यास परिषदेत भारतातील विविध राज्यातील चाळीस लोकांच्या निवडीत अमित वेंगुर्लेकर यांचाही समावेश होता. तेथील अंभ्यास परिषदेत थायलंड मध्ये इंटरनॅशनल प्राईड ऑफ इंडिया २०१८ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय लोकमुद्रा कला साहित्य संस्कृती पुरस्कार २०१८ सामाजिक कार्याची दखल घेऊन शासकीय निमशासकीय कार्यालये संस्था यांच्याकडे पीडितांच्या समस्या लेखी स्वरूपात अर्जाद्वारे हस्तांतरित करून योग्य न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
ह्युमन राईट्सचे सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांना ‘दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार प्रदान
