सेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांची यशस्वी शिस्टाई
*💫वेंगुर्ला दि.२५-:* नगरपरिषद कंपोस्ट डेपो येथे नगरसेवक संदेश निकम यांनी येथील दुर्गंधी व लाखो रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली मशिनरी व नगर परिषदच्या होत असलेल्या निकृष्ट कामांच्या कारवाईबाबत एकदिवसीय आमरण उपोषण पुकारले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी सायंकाळी उशिरा उपोषणस्थळी भेट देऊन खासदार, पालकमंत्री व आमदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून नगरविकास मंत्री यांच्यामार्फत निकृष्ट कामांची चौकशी अधिकारी नेमून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर निकम यांनी उपोषण स्थगित केले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहरप्रमुख अजित राऊळ, सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, सुरेश भोसले, विवेकानंद आरोलकर, हेमंत मलबारी, डेलीन डिसोझा, नगरसेविका सुमन निकम, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, पंकज शिरसाट, वेदांग पेडणेकर, सुयोग चेंदवणकर आदी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी डिसेंबर अखेरपर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास जानेवारीत नगर परिषद कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा संदेश निकम यांनी दिला आहे.