सिंधुदुर्गात थंडीत गर्मीचा अनुभव

*💫बांदा दि.२५-:* अतिवृष्टीनंतर कडाक्याच्या थंडीची अपेक्षा असलेल्या सिंधुदुर्गवासियांना थंडी नव्हे तर थंडीच्या दिवसामध्ये गर्मीचा अनुभव मिळत आहे. गत काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्याच्या वातावरणात टोकाचा बदल जाणवत आहे. मान्सूनचा काळ जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. त्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यापासून थंडीचा जोर वाढायला सुरूवात होते. मात्र, यावर्षी नोव्हेंबर महिना उलटला, दिवाळी सणही आटोपला तरीही थंडी अनुभवायलाच मिळाली नसल्याचे सिंधुदुर्गवासियांचे म्हणणे आहे. उलट कडा्नयाच्या थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांना पावसाळ्यातील दमट वातावरणाचा अनुभव येत आहे. वाढलेले तापमान आणि वातावरणातील बदलाने आजारपणही वाढत आहे. हे वातावरण पिकांसाठीही घातक ठरणारे असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.

You cannot copy content of this page