पतसंस्थेचे अध्यक्ष आर आर सावंतयांची पत्रकार परिषदेत माहिती
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* : ३३ वर्षापूर्वी केवळ २८ हजार रुपयांचे भागभांडवल घेवून स्थापन करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेने आता गरुड झेप घेतली आहे. आता या पतसंस्थेचे स्वतः चे ११ कोटी १० लाखांचे भागभांडवल आहे. सभासदांच्या ठेवू ५० कोटींच्या घरात पोहोचल्या आहेत. तसेच अन्य बँकांकडून घेण्यात येणारे कर्ज बंद करण्यात आले असून पतसंस्था स्वबळावर कर्ज पुरवठा करत आहे. कर्जावरील व्याज दरात कपात करून ते १०.७५ टक्के करण्यात आले आहे. आता सभासाडणकडील थकीत कर्ज निरंक करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश असल्याची माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष आर आर सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच या पतसंस्थेची आगामी निवडणूक बिनवरोध व्हावी ही आशाही व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या पतसंस्थेच्या पाच वर्षातील कारकीर्दीचा आणि संस्थेच्या उलाढालींची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद आज पतसंस्थेच्या कार्यालयात पतसंस्थेचे अध्यक्ष आर आर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष दिनेश खवळे, संचालक राजू तावडे, भाग्यवंत वाडीकर, राजू सावंत, के डी मडवल, जी व्ही नाईक, संस्थेचे सचिव निलेश कुडाळकर आदी उपस्थित होते.