* *💫सावंतवाडी दि.२४-:* शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ सांगतात आम्ही नगरपालिकेच्या काचा फोडणार, दिपक केसरकर यांच्या कार्यकर्त्यांची हीच संस्कृती आहे, का असा सवाल करत भाजपचे कार्यकर्ते पळणारे नाहीत. त्यामुळे आम्ही हा स्टाॅल कोणत्याही परिस्थितीत काढणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परब म्हणाले, गेली अनेक वर्षे जाधव नामक युवक अनाधिकृत स्टॉल लावतात. मात्र आम्ही फक्त गणपती व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर स्टॉल लावण्यास परवानगी दिली. मात्र ते नगरपालिका कर्मचाऱ्यांना तो अरेवारी भाषा करत स्टॉल नाही काढणार असल्याच उलट देत तो विनाकारण शिवसेना राष्ट्रवादीला हाताला धरून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ आम्ही नगरपालिकेच्या काचा फोडणार असे सांगत असतील तर दिपक केसरकर यांच्या कार्यकर्त्यांची हीच संस्कृती आहे, का असा सवाल त्यानी उपस्थित केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा स्टाॅल कोणत्याही परिस्थितीत काढणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी यावेळी सांगितले. तसेच यापुढे कोणत्याही प्रकारची दादागिरी खपवून घेणार नसून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी नगरसेवक सुधिर आडीवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत आम्ही तो स्टॉल काढणारच…नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा
