Headlines

मालवणचे अॅड. सुदाम म्हाडगुत वृद्धापकाळाने निधन

*⚡मालवण ता.०९-:* मालवण भरड येथील रहिवासी आणि सहकार क्षेत्रातील विधीज्ञ अॅड. सुदाम महादेव म्हाडगुत (वय-८५) यांचे आज गुरुवारी मध्यरात्री एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. अॅड. सुदाम म्हाडगुत हे मुंबई येथे सहकार क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्था या क्षेत्रात विधीज्ञ म्हणून ख्याती प्राप्त केली होती परोपकारी व मनमिळाऊ स्वभावामुळे ते जनमानसात लोकप्रिय होते…

Read More

विमानाने येणाऱ्या ७५ प्रवाशांसाठी रेड कार्पेट,तर हायवेवरून येणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी खड्डे

परशुराम उपरकर यांची टिका;भांडणाऱ्यांना नॕशनल हायवेची दूर्दशा दिसत नाही का? *⚡कणकवली ता.०९-:* चिपी विमानतळ उद्घाटनावरून सुरू असलेला शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वादंग आणि उद्घाटनाचा श्रेयवाद विमानातून येणाऱ्या फक्त ७५ प्रवाशांसाठी आहे. मात्र ज्या मुंबई-गोवा महामार्गावरून लाखो प्रवासी ये-जा करत आहेत, त्या महामार्गाची झालेली दूर्दशा या कोणत्याच राजकीय पक्षाला दिसत नाही का? अशी टिका मनसे सरचिटणीस…

Read More

कुडाळ भंगसाळ नदीत मगरीचे दर्शन

नदीच्या काठावर आली चार ते साडेचार फूट लांबीची मगर *⚡कुडाळ ता.०९-:* कुडाळ हायवेलगत असलेल्या भंगसाळ नदीमध्ये आज पुन्हा एकदा मगरीचे दर्शन पहावयास मिळाले . आज भंगसाळ नदीमध्ये चार ते साडेचार फूट लांबीची भली मोठी मगर नदीच्या काठावर पहावयास मिळाली. ही मगर पहाण्यासाठी हायवेने जा- ये करणाऱ्या पादचारी व वाहन चालक आपली वाहने थांबवून मगर पहाण्यासाठी…

Read More

आरोग्य सेविकांनी खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांची कणकवलीत घेतली भेट

*⚡कणकवली ता.०९-:* राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कमी केलेल्या २० आरोग्य सेविकांना राज्य शासनाने परत सेवेत घेण्यास मान्यता दिली आहे. या आरोग्य सेविका पूर्ववत आहे त्याच पदावर आरोग्य सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची त्या आरोग्य सेविकांनी…

Read More

बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघ शाखा सिंधुदुर्गतर्फे एकनाथ आंबोकर यांचा सन्मान

*⚡कणकवली ता.०९-:* सिंधुदुर्ग जि. प.चे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची बदली झाल्यामुळे बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघ शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने एकनाथ आंबोकर यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. १५ जून २०१८ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये बदली होऊन आलेले एकनाथ आंबोकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गेली तीन वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करून फार मोठे योगदान…

Read More

परिवहन, संसदीय कार्ये मंत्री ॲड. अनिल परब आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री ॲड. अनिल परब हे दिनांक 09 सप्टेंबर 2021 ते 12 सप्टेंबर 2021 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 09 सप्टेंबर 2021 रोजी रात्रौ 09.30 वा. हरकूळ ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव. शुक्रवार, दिनांक 10…

Read More

नाटळ मल्हार नदीवरील पूल जनतेसाठी झाला खुला

खास. विनायक राऊत, आम.वैभव नाईक , सतीश सावंत यांच्यासह शिवसेना नेत्यांची उपस्थिती *⚡​कणकवली ता.०९-:* कणकवली नाटळ मार्गावर मल्हार नदीवरील जुना पूल काही महिन्यांपूर्वी कोसळल्यानंतर याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. व यानंतर गणेशोत्सवापूर्वी मल्हार नदीवरील नवीन पूल वाहतुकीस सुरू झाला. त्याचे लोकार्पण खास. विनायक राऊत, आम. वैभव…

Read More

खारेपाटण आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे 100% लसीकरण पूर्ण करणार

खारेपाटण रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष बाळा जठार यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.०९-:* खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटणच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण लवकरच १०० % पूर्ण करणार असल्याचा निर्धार खारेपाटण प्रा आ केंद्र रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी व्यक्त केला आहे. जि. प.च्या…

Read More

सावंतवाडी बाजारपेठ गर्दीने फुलली

माटवी सामान खरेदीसाठी गणेशभक्तांची गर्दी *⚡सावंतवाडी ता.०९-:* गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक रिवाजाप्रमाणे गणपतीची माटवी सजविण्यासाठी माटवी सामान खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे.गणेश चतुर्थी एका दिवसावर येऊन ठेपली आहे. बाजारात अगोदरच विविध प्रकारच्या सामानाची रेलचेल वाढली आहे. यात पूजेचे सामान, गणपती सजावटीसाठी लागणारे रंग, मकर, भजनासाठी लागणाऱ्या वस्तू, विविध प्रकारचे पडदे आदी सामान…

Read More

सावंतवाडी शहरात प्रभागनिहाय लसीकरण मोहीम राबवावी

नगरसेवक अँड.परिमल नाईक यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.०९-:* सावंतवाडी शहरात प्रत्येक प्रभाग निहाय सर्व्हेक्षण करून लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी नगरसेवक तथा नगरपरिषद माजी आरोग्य सभापती अँड.परिमल नाईक यांनी सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनात नाईक यांनी म्हटले की, सावंतवाडी शहरात अजूनही बऱ्याच नागरिकांना कोविड- १९ प्रतिबंधात्मक लसीचा लाभ घेता आलेला नाही….

Read More
You cannot copy content of this page