मळगाव- रवळनाथ जत्रोत्सव मानकऱ्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा

*💫सावंतवाडी दि.३०-:* मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी कोरोना नियमावलींचे पालन करत गावातील ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात सकाळी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत रवळनाथ देवाची पूजा, दुपारी प्रसाद वाटप आदी कार्यक्रम पार पडले. रात्री १० वाजता मंदिरासमोरील तुलसी वृंदावनाभोवती व दिपमाळेवर दीप पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा व त्यानंतर दशावतारी नाट्यप्रयोग पार पडला. भाविकांनी जत्रोत्सवात न येता घरी राहूनच रवळनाथ चरणी नतमस्तक व्हावे, असे आवाहन देवस्थान कमिटीने केले होते. या आवाहनाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जत्रोत्सवात न येता घरी राहणेच पसंत केले.

You cannot copy content of this page