जिल्ह्यातील सर्व न्यायालये उद्या पासून पूर्ववत सुरू

जिल्हा विधी प्राधिकरण सिंधुदुर्गचे सचिव दिपक मालटकर यांची माहिती

*💫सिंधुदुर्गनगरी दि.३०-:* कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने घातलेल्या अटी शर्ती वर सुरू असलेली न्यायालये उच्च न्यायालयाने दिलेल्या १३२/२०२० च्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय व तालुका न्यायालये उद्या मंगळवार दिनांक १ डिसेंबर पासून सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. यावेळी प्रत्यक्ष न्यायिक कामकाज सकाळी ११ ते १:३० व दुपारी २ ते ४:३० या वेळेत होणार असून कार्यालयीन कामकाज सकाळी १०:३० ते ५ अशी राहणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग ओरोस चे सचिव दिपक मालटकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page