सरळ आणि निपक्षपातीपणे कार्य करत असताना घाबरु नका-दत्तात्रय नलावडे…

*💫कणकवली दि.३०-:* एस.एम.प्रशालेचे माजी विद्यार्थी आज कलेक्टर, सरन्यायाधीस, डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, व्यावसायीक आणि उद्योजक देशात आणि जगभरात चमकत आहेत, हे सर्व श्रेय कणकवली शिक्षण संस्थेचे , पर्यायाने गुरुजनांचे आहे. नोकरी आणि व्यवसाय करताना ते करत असलेल्या सामाजिक कामामध्ये माझा त्यांना नेहमीच सहकार्य आणि पाठींबा राहील. सरळ आणि निपक्षपातीपणे कार्य करत असताना घाबरु नका मी तुमच्या सतत पाठीशी असणार असे उद्गार कणकवली शिक्षण संस्थेचे सचिव नलावडे यांनी केले. श्री. दत्तात्रय नलावडे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाची दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गुणगौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपकार्याध्यक्ष श्री. काणेकर, अॅड. सावंत उमेश, डॉ. योगेश महाडिक, मीनल नार्वेकर खजिनदार, मुख्याध्यापक श्री. पोतदार, माजी मुख्याध्यापक श्री. माळी, पत्रकार विनोद जाधव, शिक्षिका अश्वीनी जाधव, नलावडे कुटुंबीय, महाडेश्वर कुटुंबीय, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इ उपस्थित होते. एस.एम.प्रशालेत शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी श्री. देसाई हे कोल्हापुर येथे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच याच शाळेतील सुरेंद्र तावडे आज मुंबई येथे सरन्यायाधीश म्हणुन काम करत आहेत, तर उमेश उमेश सावंत आपल्या जिल्ह्यात एक चांगले वकील म्हणुन काम करत आहेत. असे सांगुन ते पुढे म्हणाले, की आज यशस्वी झालेल्या या मान्यवरांनी त्यांच्या विद्यार्थी काळात अपार कष्ट घेतले, कुठल्या गोष्टीची लाज वाटुन घेतली नाही म्हणुन आज त्या पदाला पोहचले आहेत, हा त्यांचा आदर्श विद्यार्थीं ठेवणे गरजेचे आहे. आपल्याविषयी स्वभावाविषयी बोलताना ते म्हणाले माझा स्वभाव नारळाप्रमाणे वरुन टनक आणि आतुन मधुर असा आहे. माझ्याकडे कामानिमित्त येणार्या लोकांचा चेहरा पाहुन मला त्यांच्या मनात काय हेतु आहे ते ओळखणे ही ईश्वरी देणगी मला मिळाली आहे. मला आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपला ऋणी आहे, असे ते म्हणाले. अॅड. उमेश सावंत म्हणाले, सामाजिक सेवा करणार्यासाठी नलावडे यांचे व्यक्तीमत्व दुमिर्ळ आदशर्र् आहे. पुलदेशपांडे यांना नलावडे भेटले असते तर बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तीमत्व असे नवीन पात्र व्यक्ती आणि वल्ली नलावडे यांच्या रुपाने समाविष्ट झाले असते. कार्यक्रमात उपकार्याध्यक्ष श्री. काणेकर यांनी पुस्तकांच्या सारांश रुपात मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. योगेश महाडिक, माजी मुख्याध्यापक माळी, खजिनदार मीनल नार्वेकर, मुख्याध्यापक पोतदार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. मसुरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page