आघाडीचे तिघाडीच्या सरकारने कोकणावर अन्याय केला- आ.रविंद्र चव्हाण…

ठाकरे सरकार एक वर्षाच्या परीक्षेत नापास झाले; जिल्हा बँकेत राजकीय दृष्ट्या चुकीच्या पद्धतीने नोकर भरती.

*💫कणकवली दि.३०-:* महाराष्ट्रात तिघाडीच्या सरकारमध्ये आघाडी नसून बिघाडी आहे. महाराष्ट्र अधोगतीकडे या सरकारने नेला.त्याउलट गेल्या ५ वर्षात फडणवीस सरकारने राज्यात काम मोठे उभे राहिले.उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढली,चांगलं काम केलं होत.नागरिकांना जी कोरोना काळात थेट मदत झाली,त्याचे काम आमच्या सरकारने केले होते.केंद्राने मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून चागंल पॅकेज दिल आहे.एकाच व्यासपीठावर ठाकरे व फडणवीस यांनी यावं.काय केलं, त्याच उत्तर द्यावे.या सरकारला गुण द्यायचे झाले तर कोणत्याही परिस्थितीत नापास होईल असं वाटतं. तिघाडीच्या सरकारने कोकणावर अन्याय केला असल्याचा घणाघाती आरोप आ.रविंद्र चव्हाण यांनी केला.तसेच जिल्हा बँकेत राजकीय दृष्ट्या नोकर भरती केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कणकवली येथील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ.नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,राजन चिके,बाळा कुबल आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते शिवसेनेने युती धर्म पालन केला नाही,तो कणकवलीत.शिवसेनेने आमच्या विरोधात एबी फॉर्म दिला.तेव्हाच आम्ही अंदाज बांधला होता.तरीदेखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उमेदवार निवडून आणण्यासाठी राज्यात जास्त सभा घेतल्या.त्यानंतर अचानक घुमजाव केला गेला.सत्तेसाठी कॉग्रेस,राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी झाली.राज्यातील सरकारचा एक वर्षाचा लेखा-जोखा पाहता, होत ते बंद केले.विकास कामांना स्थगिती दिली. पृथ्वीराज निर्णय घेत नव्हते.ठाकरे सरकारने फक्त स्थगिती देण्याचे काम केले,असल्याचा आरोप आ.रविंद्र चव्हान यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय केले?.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बजेट सातत्याने वाढत बजेट होतं, पण आताच बजेट किती झाले हे पहा.टिकेमधूनही अनेक गोष्टी पुढे आले आहेत.जिल्ह्यात पीएम केअरच्या माध्यमातून व्हेंटिलेटर देण्यात आले.सीएम केअर मधून एकही नाही.केंद्र सरकारच्या वतीने नोव्हेंबर पर्यतच धान्य मोफत देण्याची व्यवस्था झाली.मोदी सरकारने जनधन,कृषी सन्मान अश्या वेगवेगळ्या योजनांचे पैसा आला.राज्य सरकारने एक फुटकी कवडी दिली नाही.बारा बलुतेदार व मच्छिमार यांना काहीच दिले नाही.फयान वादळातील पैसे ६५ कोटी निविदा प्रक्रिया करता येतील असे पॅकेज काढले आहे.मच्छिमार कोरोनात समुद्रात गेला नाही.त्यांना सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. कोरोना काळात प्रत्येक माणूस अडचणीत होता.सर्व परस्थितीमध्ये देशाला उभारी देण्यासाठी आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून केंद्राने दिलासा दिला.प्रत्येक नगरपंचायत पालिका क्षेत्राततील छोट्या व्यावसायिकान १० हजार कर्ज दिले.केंद्र सरकार कामगारांच्या मोठ्या प्रमाणात सरकार पाठीशी उभे राहिले पाहिजे होते.या राज्यातील सरकारने सर्वांना वाऱ्यावर सोडले.सिधुदुर्ग जिल्हात एकही रुपया नाही.गेल्या एक वर्षात लोकांना पगार वेळेत मिळाला नाही.एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाहीत.तिघाडीचे सरकार सपशेल फेल आहे,असा टोला आ.चव्हाण यांनी लगावला. कोरोना काळात अनेक जण घरात होते.वीज बिल माफ करणार असे या सरकारने सांगितले होते.उलट त्यांनी त्या काळात परिपत्रक काढलं,सरासरी बिल देऊ,आता तीन पट बिल आला आहे.सर्वच कार्यकर्त्यामध्ये खदखद आहे.वीज बिल माफ सोडाच उलटा सर्वसामान्य माणसाला शॉक लावला या सरकारने..!महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीतही तसे झाले.सर्व परीक्षाचा गोधळ झाला.शाळा सुरु होण्यासाठी सावळा गोधळ आहे.ही सर्व मंडळी चुकीचे धोरण राबवत आहे.दारुची दुकाने पहीली सुरु केली, पण उद्योग उशिरा सुरु केले.शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही.खावटी कर्जे अद्याप दिली नाहीत.शेतकऱ्यांची कंबर मोडण्याचे काम सरकारने केले.त्यावेळी मुख्यमंत्री हेक्टरी ५० हजारांची मागणी केली.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करेन ही घोषणा सत्तेवर येण्यापूर्वी ठाकरेंनी केली होती.त्या सगळ्या घोषणा हवेत राहिल्या आहेत. गेल्या सरकारमध्ये मराठा आरक्षण यांची चर्चा होती.मराठा आरक्षण या सरकारला ठिकावता आले नाही.कोरोना सेंटरमध्ये अत्याचार रुग्णांनावर केले आहेत.भात खरेदी केंद्र गेल्यावेळी वेळीच सुरु झाली होती. अद्याप भात खरेदी अद्यापही नाही.रिक्त पदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत.या ठिकाणी असणाऱ्या मुख्यमंत्री व प्रतप्रधान सडक योजना पाहता आताच्या काळात मोठा दुर्लक्ष होताना दिसत आहे. सिंधुदुर्ग बँक ही प्रतिष्ठित आहे.वारंवार या बँकेत राजकिय दृष्टया नोकर भरती चुकीच्या पद्धतीने केली जात आहे.हे थांबवणं गरजेचं आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे.दरडोई उत्पन्न वाढण्याची स्थिती असताना सरकार कोकणाकडे दुर्लक्ष करताना दिसंत आहे.सरकार दुर्लक्ष करत आहे.काजू बोर्ड करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता.कॉलेज दूर नेण्याचं काम हे सरकार करत आहे.अनेक विषय पूर्वीच्

You cannot copy content of this page